Nora Fatehi Saam Tv
मनोरंजन बातम्या

'कास्टिंग डायरेक्टरने घरी बोलवलं अन्...', किस्सा सांगताना Nora Fatehi चं रडु आवरेना...

नोराला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी नकारांचा सामना करावा लागला होता.

Chetan Bodke

Nora Fatehi: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या अभिनयासोबतच एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. तिने आपल्या डान्सचा जलवा अनेक कार्यक्रमांमध्ये सादर केला आहे. आज नोराने तिच्या जबरदस्त डान्सिंग मूव्ह्सने चाहत्यांना वेड लावले आहे. मात्र, हे स्थान मिळवणे नोरासाठी सोपे नव्हते. नोराला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी नकारांचा सामना करावा लागला होता. नोराने गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या स्ट्रगलिंगचे काही किस्से सांगितले होते, ते सांगताना नोराही भावूक झाली होती.

एका मुलाखतीत नोराने सांगितले की, 'जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होती, तेव्हा एका महिला कास्टिंग डायरेक्टरने ऑडिशनच्या बहाण्याने मला तिच्या घरी बोलवले होते. तेव्हा मला त्या दिग्दर्शकेने खूप वाईट वागणूक दिली होती.’

जेव्हा नोरा कास्टिंग डायरेक्टरच्या घरी पोहोचली तेव्हा ती नोरावर भडकत म्हणाली, 'फिल्म इंडस्ट्री तुमच्यासारख्या लोकांमुळे त्रासलेली आहे, तुमच्यासारखे लोक सर्वत्र आहेत, आम्हाला तुमच्यासारखे लोक नको आहेत.' या घटनेनंतर नोरा निघून गेली.

एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करताना नोराने सांगितले की, कास्टिंग डायरेक्टरचे असे कटू शब्द ऐकून ती रडू लागली. नोरासाठी हा नकार नवीन नव्हता, ऑडिशन्स दरम्यान हिंदी येत नसल्यामुळे नोराची अनेकदा खिल्ली उडवली गेली. हे सर्व किस्सा सांगताना नोराला रडू आवरत नव्हतं. अनेकदा मिळालेल्या अपयशानंतर मोठ्या जिद्दीने नोरानं आपलं स्थान बॉलिवूडमध्ये पक्क केलं आहे.

नोराने आपला जलवा म्यूझिक अल्बमपासून तर चित्रपटापर्यंत दाखवला आहे. ‘नाच मेरी रानी’, ‘गर्मी’, ‘कमरिया’ या आणि अशा अनेक गाण्यांपासून तिने आपला जलवा सर्वत्र दाखवला. नोरा नेहमीच डान्समुळे सर्वत्र प्रकाशझोतात कायम राहिली आहे.

सर्वांची लाडकी बॉलिवूड अभिनेत्री नोरा गेल्या काही दिवसांपासून एका वादात चांगलीच अडकली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे याप्रकरणी नोराला दिलासा मिळेल की आणखी तिच्या अडचणी वाढणार हा येणारा काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT