Pathan Movie Booking: शाहरुखच्या 'पठान'चे चाहत्यांना 'वेड'; सांगलीच्या जबरा फॅनची देशभर चर्चा

शाहरुख एका चाहत्याने तर चित्रपटाचे एक-दोन नाही तर तब्बल ११० तिकिटे विकत घेतली.
Shah Rukh Khan Fans Book A Theater To Watch Pathan
Shah Rukh Khan Fans Book A Theater To Watch Pathan Saam Tv
Published On

रणजीत माजगावकर

Shah Rukh Khan Fans Book A Theater: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ४ वर्षांनी शाहरुखचा चित्रपट येत असल्याने त्याचे चाहते खूप खुश आहेत. चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखच्या असंख्य चाहत्यांनी ऍडव्हान्स बुकिंग देखील केली आहे. शाहरुख एका चाहत्याने तर चित्रपटाचे एक-दोन नाही तर तब्बल ११० तिकिटे विकत घेतली आहेत.

Shah Rukh Khan Fans Book A Theater To Watch Pathan
Pathan Movie Booking: लाखोंची तिकीट आणि करोडींची कमाई, प्रदर्शनापूर्वीच 'पठान' चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

शाहरुख खानचे आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याच्या चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यासाठी ते काहीही करू शकतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. शाहरुखच्या एका चाहत्याने २५ जानेवारीच्या फर्स्ट दे फर्स्ट शोची तब्बल ११० तिकिटे बुक केली आहेत. तसेच त्याने या तिकिटांसह त्याचा फोटो देखील शेअर केला आहे.

सांगलीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर वसीम खान या शाहरुखच्या चाहत्याने आणी त्यांच्या साथीदारांनी 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर केले बुक आहे. तसेच त्यांनी तिकिटांसह त्यांचा फोटो शेअर करत शाहरुखला टॅग देखील केला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे, शाहरुख सर प्लिज बघा आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. संपूर्ण जग तुमचा 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी तयार आहे. त्याचे हे ट्विट शाहरुखने रिट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत.

२५ जानेवारीला प्रदर्शित होणारी शाहरुखच्या चित्रपटासाठी सगळे सज्ज आहेत. जगभरात त्याच्या चित्रपटांची विक्रमी विक्री झाली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com