Pathaan Controversy: 'शाहरुखनं मला फोन करावा तरंच...' आसामच्या मुख्यमंत्र्यांची गजब मागणी...

चित्रपटाच्या वादावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतेच मोठे वक्तव्य केले आहे.
Pathaan Controversy
Pathaan ControversySaam Tv

Pathaan Controversy: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस एका सणापेक्षा कमी नाही. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देशभरात वाद सुरू आहे. चित्रपटाच्या वादावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतेच मोठे वक्तव्य केले आहे. सीएम सरमा म्हणाले, 'कोण आहे शाहरुख खान? मी शाहरुखला ओळखत नाही.' याशिवाय चित्रपट पाहण्याच्या प्रश्नावर ते म्हणतात, मी चित्रपट पाहणार नाही.

Pathaan Controversy
Pathan Movie Booking: लाखोंची तिकीट आणि करोडींची कमाई, प्रदर्शनापूर्वीच 'पठान' चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट नारेंगी येथील एका सिनेमागृहात दाखवण्यात येणार होता, मात्र बजरंग दलाने हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमांना काही माध्यमांनी याबाबत काही प्रश्न विचारले होते.

यावर सरमा म्हणतात, “खानने मला फोन नाही केला. मात्र जेव्हा एखादी समस्या उपस्थित झाली तेव्हा वेळोवेळी मला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी फोन केला आहे. जर खानने मला फोन केला, तरच मी या प्रकरणाकडे गंभीरतेने बघेल. जर काही लोकांनी कायदा आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्याविरोधात कारवाई होईल. त्याचसोबत गुन्हाही दाखल होईल.”

Pathaan Controversy
Bigg Boss 16: बिग बॉस १६ 'या' स्पर्धकाला मिळणार चित्रपटामध्ये काम करण्याची संधी, सलमानने स्वतः जाहीर केले नाव

पठान चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या बिकिनीमध्ये असल्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोणला टीकेचा सामना करावा लागत आहे. विश्व हिंदू परिषदेसह अनेक नेत्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. खान बॉलिवूडचा सुपरस्टार असल्याचे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यावर सरमा म्हणाले की, राज्यातील जनतेने हिंदीपेक्षा आसामी चित्रपटांची चिंता केली पाहिजे.

Pathaan Controversy
Nora Fatehi Jacqueline Fernandez: नोरा फतेही जॅकलिनवर जळायची, रोज करायची १० कॉल; सुकेशचा खळबळजनक दावा

या संपूर्ण वादावर अभिनेता शाहरुख खान डिसेंबर २०२२ मध्ये म्हणाला होता की, 'आम्ही आनंदी आहोत. जग काय करते? आम्ही, तुम्ही आणि सकारात्मक लोक राहिले तर जग जिवंत राहील.' 'बेशरम रंग' या गाण्यावरून वाद वाढतच चालला आहे. यावर अनेक मंत्री आणि संघटनांनी त्या गाण्यासह चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली, तर अनेकांनी त्यांच्या निषेधार्थ पोस्टर जाळले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com