Mrunal Thakur Shared On With Daniel Radcliffe Selfie Instagram
मनोरंजन बातम्या

Mrunal Thakur: दाक्षिणात्य अभिनेत्रीने काढली ‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्यासोबत सेल्फी, ‘या’ ठिकाणी झाली भरगर्दीत भेट

Mrunal Thakur And Daniel Radcliffe Selfie: नुकतंच दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूरने इन्स्टा स्टोरीवर एका हॉलिवूड अभिनेत्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

Chetan Bodke

Mrunal Thakur Shared On With Daniel Radcliffe Selfie

अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे बरीच चर्चेत आहे. मुळची धुळ्याची असलेली मृणाल ठाकूर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. सध्या ती परदेशवारी करते.

‘हाय नैना’ ह्या आगामी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी मृणालने न्यूयॉर्कमध्ये हजेरी लावली आहे. नुकतंच मृणालने इन्स्टा स्टोरीवर एका हॉलिवूड अभिनेत्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये मृणालसोबत दुसरा तिसरा कोणी नसून हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृणाल ठाकूर आणि साऊथ सुपरस्टार नानीसोबतचा ‘हाय नैना’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मृणाल सध्या न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन ट्रिपचा आनंद लुटत आहे. मृणालने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या एका स्टोरीमध्ये, तिच्यासोबत हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ दिसत आहे. त्याने मास्क लावून तिच्यासोबत सेल्फी घेतलेला दिसत आहे. सध्या अभिनेत्रीच्या ह्या सेल्फीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Mrunal Thakur Shared On With Daniel Radcliffe Selfie

गेल्या अनेक दिवसांपासून मृणाल ठाकूरचे ‘हाय नैना’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट ७ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटामध्ये, नानी आणि मृणाल ठाकूर एकत्र दिसत आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT