लव्हयापा फेम अभिनेत्री खुशी कपूर चांगलीच चर्चेत आली आहे.
खुशी कपूरचा पिवळ्या ड्रेसमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
खुशी कपूरने ब्रेस्ट सर्जरी केल्याचे बोले जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री खुशी कपूर कायम आपल्या स्टाइल आणि फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तरूणाईमध्ये खुशीची भरपूर चर्चा पाहायला मिळते. अलिकडेच खुशी कपूर एका सुंदर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या ड्रेसच्या डीप नेकलाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. तिचे cleavage पाहून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
खुशी कपूरच्या या लूकला नेटकरी ट्रोल करत आहे. तसेच कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. खुशी कपूरने हा लूक डायमंड ज्वेलरी, काळ्या स्लिपर्स आणि ब्रँडेड बॅगने पूर्ण केला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी तिचे सौंदर्य पाहून भरपूर कमेंट्स करत आहे. एका युजरने म्हटले की, "सिलिकॉन इम्प्लांट्स" तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "ब्रेस्ट सर्जरी केली आहे का?" तर एका युजरने खुशीची खिल्ली उडवत कमेंट केली की, "मित्रांनो हे सगळं प्लास्टिक आहे"
खुशीच्या व्हिडीओवर काही लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. खुशीने अद्याप ब्रेस्ट इम्प्लांटच्या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हिडीओत खुशी कपूर एका लग्जरी कारमध्ये बसताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण देखील पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
खुशी कपूरने 2023 साली रिलीज झालेल्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. अभिनेत्री नादानीया, लव्हयापा अशा चित्रपटांमध्ये झळकली आहे. खुशीचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.