Heartburn: रात्रीच्या वेळेस हार्टबर्नचा त्रास अधिक का होतो?

Surabhi Jayashree Jagdish

हार्टबर्न म्हणजे काय?

हार्टबर्न म्हणजे पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येऊन छातीत जळजळ निर्माण होणे होय. यामुळे छाती, घसा किंवा तोंडात आंबटपणा जाणवू शकतो. ही समस्या वारंवार होत असल्यास ती अॅसिड रिफ्लक्सचे लक्षण असू शकतं.

nighttime heartburn | saam tv

रात्री हार्टबर्नचा त्रास अधिक का होतो?

दिवसभर आपण उभं किंवा बसलेलं असल्यामुळे पोटातील आम्ल खाली राहतं. मात्र झोपल्यावर शरीर आडवं होतं आणि ते वरच्या बाजूला येतं. त्यामुळे पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाण्याची शक्यता वाढते.

GERD symptoms | saam tv

जेवणानंतर लगेच झोपणं

रात्री उशिरा जेवून लगेच झोपल्यास अन्न अजूनही पोटात असते. अशा वेळी अन्न पचवण्यासाठी तयार झालेले आम्ल वर येण्याची शक्यता वाढतं. त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

chest burning | saam tv

पोट पूर्ण रिकामं होण्यासाठी वेळ लागतो

जेवणानंतर पोटाला अन्न पचवण्यासाठी काही तासांची गरज असते. या काळात पोट मोठ्या प्रमाणात आम्ल तयार करत असतं. पचन पूर्ण होण्यापूर्वी झोपल्यास हे आम्ल अन्ननलिकेकडे जाऊ शकते.

digestive health | saam tv

३-४ तासांचा नियम

तज्ज्ञांच्या मते झोपण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास आधी जेवण करावं. यामुळे पोटातील अन्न लहान आतड्यात पुढे सरकण्यास पुरेसा वेळ मिळतो. परिणामी झोपताना अॅसिड रिफ्लक्स होण्याचा धोका कमी होतो.

esophagus irritation | saam tv

कशी टाळाल समस्या?

रात्री जड, तेलकट, तिखट किंवा अतिप्रमाणात अन्न खाणं टाळावं. जेवणानंतर लगेच आडवं होता थोडा वेळ चालणं फायदेशीर ठरतं. तसंच उशी थोडी उंच ठेवून झोपल्यास आम्ल वर येण्याची शक्यता कमी होते.

late night eating | saam tv

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

हार्टबर्नचा त्रास आठवड्यातून अनेक वेळा होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वारंवार अँटॅसिड घेऊनही आराम मिळत नसेल तर तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं. छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर गंभीर लक्षणं असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

acid reflux causes | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

येथे क्लिक करा