Emergency Trailer Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट पुन्हा एकदा वादात

Kangana Ranaut Emergency Movie : कंगना राणौत यांचा 'इमर्जन्सी' चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत त्यांच्या अभिनयामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीचं चर्चेत असतात. २०२४ यावर्षाची सुरुवात कंगना यांच्यासाठी एकदम खास राहिली. त्यात कंगना यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला कंगना यांने त्यांच्या इमर्जन्सी या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांच्या मनामध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलीय. परंतु इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त अजून सापडत नाहीये. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे.

कंगना रणौत यांनी मणिकर्णिका या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं होतं. 'इमर्जन्सी' हा चित्रपट कंगनाच्या आयुष्यातील सर्वात खास चित्रपट असल्याची माहिती त्यांनी अनेक मुलाखातीदरम्यान दिली. 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटामुळे कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. पंजाबमधील . शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून या चित्रपटाला विरोध करण्यात आलाय. चित्रपटामध्ये शिखांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने या चित्रावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याशिवाय कंगना राणौतवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये मिलिंद सोमण मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटामध्ये मिलिंद सोमन सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यासोबतच कंगना रणौत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत त्यासोबतच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि श्रेयस तळपडे यांचा अभिनय सुद्धा चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT