Jiya Shankar Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jiya Shankar Video: रितेशला 'वेड' लावणारी ऑनस्क्रिन गर्लफ्रेंड माहितीये का? जिममधील तिचा VIDEO बघा!

Jiya Shankar Gym Video : वेड चित्रपटातील निशा म्हणजेच जिया शंकर सर्वांना आठवत असेल. जिया नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. जियाने नुकताच जिममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Siddhi Hande

बॉलिवूड अभिनेत्री जिया शंकर नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. जिया शंकर मराठीसह हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जिया शंकर तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. अनेकदा ती जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर पापाराझींसमोर स्पॉट होते. जिया शंकरने नुकताच तिच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जिया शंकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. जिया या व्हिडिओत डम्बल उचलून व्यायाम करताना दिसत आहे. जियाचा फिटनेस ट्रेनर तिला ट्रेन करताना दिसत आहे. जिया तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. जियाने जिममधील हा व्हिडिओ शेअर केला आहे. जियाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जिया नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असते. जिया कितीही व्यस्त असली तरीही आपल्या शरीराची विशेष काळजी घेते. जिया आपला डाएट प्लान फॉलो करते. आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करते. याचसोबत ती जिम, वर्कआउट आणि योगासनेदेखील करते. जिया या मेहनतीमुळेच खूप फिट राहते.

जियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, जियाने वेड या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. जिया बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती. जियाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT