Janhvi Kapoor And Shikhar Pahariya Video Instagram
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika 2nd Pre Wedding : प्री-वेडिंग अनंत-राधिकाचा पण चर्चा जान्हवी- शिखरची; भर पार्टीत अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला भरवला घास, Video Viral

Janhvi Kapoor And Shikhar Pahariya Video : मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा इटलीमध्ये अलिशान क्रूझवर दुसरा प्री- वेडिंग इव्हेंट आटोपला. या इव्हेंटमधला जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंटचा दुसरा प्री- वेडिंग इव्हेंट नुकताच आटोपला. या सोहळ्याला हॉलिवूडसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी लग्नाला 'नो फोन पॉलिसी' असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी प्री- वेडिंग इव्हेंटमधील फोटो किंवा व्हिडीओ शेअर केलेले नाही. पण अशातच सध्या इन्स्टाग्रामवर एका बॉलिवूडच्या क्यूट कपलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांनी जरीही त्यांचं नातं जाहीर केलं नसलं तरीही त्यांच्या रिलेशनची कायमच चर्चा होते. अनेकदा हे क्यूट कपल सोशल मीडियावर चर्चेत असतं. अनेकदा सोशल मीडियावर हे कपल एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच सध्या, राधिका आणि मुकेश यांच्या इटलीतल्या दुसऱ्या प्री- वेडिंगमधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. दोघंही वयाच्या १५- १६ वर्षापासूनच एकमेकांना ओळखत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जान्हवीने S नावाचं लॉकेटही वेअर केलेलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

सध्या इन्स्टाग्रामवर जान्हवी व शिखरचा प्री-वेडिंगमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत, जान्हवी आणि शिखर आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत प्री-वेडिंग एन्जॉय करताना दिसत आहेत. तसंच अभिनेत्री मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना दुसऱ्या बाजूला बॉयफ्रेंडला जेवणाचा घास भरवताना दिसते. जान्हवी आणि शिखरच्या या क्यूट व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सध्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांकडून त्यांच्या रिलेशनचे जोरदार कौतुक होत आहे. त्यासोबतच त्यांना अनेकांनी 'मेड फॉर इच अदर' अशीही कमेंट केलेली आहे.

एकीकडे पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलेली जान्हवी सध्या तिच्या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. एकीकडे प्री-वेडिंगमध्ये जान्हवी धमाल मस्ती करत असून बॉक्स ऑफिसवर तिचा चित्रपट फारशी कमाई करताना दिसत नाही. पहिल्या दिवशी दिलासादायक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या चित्रपटाला म्हणावा तितका खास प्रतिसाद दिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

'मंगळसूत्र चोराचा...sss' जितेंद्र आव्हाडांनी भाजप आमदाराला डिवचलं; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT