Hema Malini Finally Reacts To Not Living With Dharmendra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hema Malini And Dharmendra News: प्रेमविवाहानंतरही धर्मेंद आणि हेमा मालिनी एकत्र राहत नव्हते; अभिनेत्रीने मुलाखतीत केला मोठा खुलासा

Hema Malini Reavel Why Dharmendra Have Been Living In Separate: मुलाखतीत हेमा यांनी लग्नानंतर ते धर्मेंद्र यांच्यासोबत का राहत नाही, याबद्दलचा खुलासा केला.

Chetan Bodke

Hema Malini Finally Reacts To Not Living With Dharmendra: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कपलपैकी एक. या कपलच्या लग्नाला ४० वर्षांहून अधिक वर्ष झाली आहेत. दोघांनी ही १९८० मध्ये लग्न केले होते.

धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न होतं. त्यांना पहिल्या पत्नीकडून चार मुलं होते. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला होता. पण दुसरं लग्न केलं तरी, धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच सोडण्याचा निर्णय घेतला नाही. नुकतंच एका मुलाखतीत हेमा यांनी लग्नानंतर ते धर्मेंद्र यांच्यासोबत का राहत नाही, याबद्दलचा खुलासा केला.

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या आहेत. यांचा घटस्फोट झाला नाही तरी देखील त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण हेमा यांनी धर्मेंद्रसोबत लग्न करावा हा निर्णय हेमा यांच्या वडिलांना पटलेला नव्हता. त्यांना हे नात अमान्य होतं. तरी देखील हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर वेगळं राहून त्यांच्या दोन्ही मुलींचं संगोपन करण्याचा निर्णय हेमा यांनी घेतला होता. नुकताच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हेमा यांनी त्यांच्या लग्नानंतरचे आयुष्य कसे होते, हे सांगितले.

हेमा मालिनी मुलाखतीत म्हणतात, “खरं तर कोणालाही एकटं राहायला आवडत नाही, पण जरी कधी तशा घटना घडल्या तर राहावं लागतं. त्यामुळे आलेल्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपण जीवन जगायला हवं. अन्यथा कोणालाच जीवन जगायला आवडणार नाही. प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यात, कठीण परिस्थितीत तिचा नवरा, मुलं आणि तिचं कुटुंब तिला हवं असतं. पण काहीतरी गोष्टी आपल्या हातापलिकडे गेल्या आहेत. हातापलिकडे गेलेल्या गोष्टींबद्दल आता मला काहीही वाटत नाही, त्याची तक्रार देखील मला करायची नाही.”

हेमा मालिनी आपल्या मुलाखतीत म्हणतात, “आता सध्या मी माझ्या आयुष्यात खुश आहे. माझ्या सोबत माझ्या दोन मुली, त्यांचं पालनपोषण आणि त्यांचं संगोपन मी व्यवस्थित करते. मी अनेक वर्षांपासून ‘गुरू माँ’ ची अनुयायी आहे. मी अनेक महत्वाच्या आणि वैयक्तिक प्रसंगातही त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे. माझ्या मुलींचं नाव ईशा आणि अहाना आहे. त्यांच्या पाठीमागे, एक भक्कम आधारस्तंभ म्हणून सदैव वडील धर्मेंद्र कायमच उभे राहिलेत.”

आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या भागात हेमा मालिनी म्हणतात, “ईशा आणि अहाना यांच्यासाठी धर्मेंद्र वडील म्हणून नेहमीच हजर राहायचे. हीच आमच्यासाठी महत्वाची आणि सर्वोत्कृष्ट बाब आमच्यासाठी होती. नेहमीच एक वडिल म्हणून धर्मेंद्र आपल्या मुलींच्या लग्नाबद्दल खूपच चिंतेत राहायचे. दोन्ही मुलींना चांगला साथीदार मिळावा, योग्य व्यक्तीशी लग्न व्हावं अशी नेहमीच त्यांची इच्छा होती. मी धर्मेंद्र यांना म्हणायचे, योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आलं की तेव्हा ते होईल. देवाच्या आणि गुरू माँच्या कृपेने सर्वकाही चांगलं झालं” अशी प्रतिक्रिया हेमा यांनी दिली.

आयुष्याच्या टर्निंग पॉईंटवर असताना, हेमा धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा, धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. पण तरीही सर्व विरोधांना न जुमानता हेमा आणि धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये लग्नगाठ बांधली. १९८१ मध्ये हेमा यांनी ईशाला तर १९८५ मध्ये अहानाला जन्म दिला. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आहेत. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT