Who Is Tarla Dalal : कोण आहेत भारतातील पहिल्या होम शेफ तरला दलाल ? जाणून घ्या त्यांच्याविषयी माहीत नसलेल्या 'या' गोष्टी

Huma Qureshi Movie : शेफ, कूकबुक लेखक ते कुकिंग शो होस्ट करणाऱ्या तरला दलाल यांनी अनेकांची मने जिंकली.
India's first home chef Tarla Dalal
India's first home chef Tarla DalalInstagram @zee2
Published On

Indian Home Chef Tarla Dalal : तरला भारतातील पहिल्या होम शेफ होत्या. शेफ, कूकबुक लेखक ते कुकिंग शो होस्ट करणाऱ्या तरला दलाल यांनी अनेकांची मने जिंकली. ७ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरला नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चित्रपटात हुमा कुरेशीने तरला यांची भूमिका साकारली आहे तर शरीब हाश्मीने त्यांच्या पतीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया तरला दलाल यांच्या विषयी.

तरला दलाल यांचा जन्म आणि शिक्षण पुणे येथे झाले. त्यांना लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. 12 वर्षांची असताना, तरला त्यांच्या आईला स्वयंपाकघरात मदत करायच्या आणि त्यातूनच त्यांना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. घरातील स्वयंपाकपासून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला आणि फूड रायटर लेखक आणि ऑथर झाल्या. (Latest Entertainment News)

India's first home chef Tarla Dalal
Jawan Prevue Views : पठानपेक्षा 'जवान'ला तगडा रिस्पॉन्स ; रोमँटिक शाहरूखपेक्षा व्हिलन लूकला 'जबरा फॅन'ची पसंती

तरला यांचे लग्न अमेरिकेतील अभियंता नलिन दलाल यांच्याशी 1960 मध्ये झाले. लग्नानंतर त्या मुंबईला आल्या. 1966 मध्ये त्यांनी घरी स्वयंपाकाचे क्लास घ्यायला सुरूवात केली. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, त्यांच्या पतीनेच त्यांना प्रोत्साहन दिले आणि पाठिंबा दिला. त्यांना संजय दलाल, दीपक दलाल आणि रेणू दलाल ही तीन मुले आहेत.

2005 मध्ये त्यांचे पती नलिन यांचे निधन झाले, तर नोव्हेंबर 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांचे निधन झाले तेव्हा त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांची मुलगी रेणू हिने त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवले आहे. ती आज सर्वात लोकप्रिय शेफपैकी एक आहे.

1974 मध्ये, तरला यांचे 'द प्लेझर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग' नावाचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी 100 हून अधिक पुस्तके लिहिली आणि त्यापैकी बरीच हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली आणि डच भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत.

अहवालानुसार, त्यांच्या पुस्तकांच्या 10 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. त्यांनी 17000 हून अधिक पाककृती लिहिल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. त्यांनी स्वयंपाकाची बरीच मासिकेही प्रकाशित केली. 2007 मध्ये, त्यांनी टोटल हेल्थ नावाची कुकबुक मालिका सुरू केली.

India's first home chef Tarla Dalal
LGM Trailer Launched : एमएस धोनीची पत्नी साक्षीसह नवी इनिंग ; 'लेट्स गेट मॅरिड'चा ट्रेलर प्रदर्शित

त्यांचा पहिला टीव्ही शो कुक इट अप विथ तरला दलाल 3 वर्षे टीव्हीवर प्रसारित झाला. हा शो संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया, आखाती देश, यूके आणि यूएस मध्ये प्रसारित झाल्यामुळे त्या जगभरात नावारूपास आल्या. पाककला विश्वातील त्यांचे योगदान पाहून त्यांना 2007 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

७ जुलै रोजी हुमा आणि शरीबचा तरला हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झाला. पियुष गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात भारती आचरेकर, पूर्णेंदू भट्टाचार्य आणि अमरजीत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटामध्ये दिवंगत शेफचा प्रवास दाखविण्यात आला आहे. तरला आणि नलिनच्या भूमिकेत हुमा आणि शरीब यांनी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com