Esha Deol SAAM TV
मनोरंजन बातम्या

Esha Deol : "आयुष्यात रोमान्स...", लेकीच्या घटस्फोटानंतर हेमा मालिनी यांचा मोलाचा सल्ला

Esha Deol Shares Mom Hema Malini Advice : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने आपल्या घटस्फोटानंतर आई हेमा मालिनी यांनी दिलेला सल्ला शेअर केला आहे. हेमा मालिनी नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचे पावर कपल अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini ) कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिले आहेत. यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. यांची मुलगी ईशा देओलने देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. आता ईशा देओल (Esha Deol) 'तुमको मेरी कसम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते ईशाचा दमदार सिनेसृष्टीत कमबॅक पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. ईशा सध्या चित्रपटाचे प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे.

2024 मध्ये ईशा देओलचा घटस्फोट झाला. तेव्हा हेमा मालिनी यांनी ईशाला एक गोष्टी सांगितली होती. याचा खुलासाने ईशा देओलने नुकत्याच दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत केला आहे. ईशा आपल्या आईने दिलेल्या शिकवणीबद्दल सांगताना म्हणाली की, "प्रत्येक आई आपल्या मुलीला स्वतःची ओळख बनवण्याची शिकवण देते. माझ्याही आईने तेच केले. तू काम कर. मेहनत कर आणि तुझे करिअर तू ठरव. असे तिने मला सांगितले. तुझे नाव झाले नाही तरी चालेल मात्र तुझ एक प्रोफेशनल नक्कीच असायला हवे. ते कधीच सोडू नकोस. काम करत राहा."

ईशा पुढे म्हणाली, "आई बोलायची की तू करोडपतीशी लग्न केल असले तरी तू स्वतः आर्थिकरित्या सक्षम पाहिजे. कारण जेव्हा एखादी स्त्री आर्थिक रूपाने स्वतंत्र होते तेव्हा ती खूप वेगळी असते.आपण काम करतो, स्वतःची काळजी घेतो. मात्र रोमान्स मागे ठेवतो. पण रोमान्स कधीच संपला नाही पाहिजे. तो आयुष्यात असावा. प्रेम आणि रोमान्समुळे तुमच्या पोटात फुलपाखरं उडायला लागतात. ही ती भावना आपल्या सर्वांना अनुभवायची असते. तिचा हा सल्ला माझ्या कायम डोक्यात राहीला आहे. "

ईशा देओलने 2024 मध्ये पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतला. यांना दोन मुलं देखील आहे. ईशा देओलच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ईशा देओल 'तुमको मेरी कसम' चित्रपट 21 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT