Deepika Padukone On Embracing Motherhood Saam TV News
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Ranveer Singh : मुलगी झाली हो! रणवीर-दीपिका बनले आई-बाबा

Deepika Padukone Ranveer Singh Welcome baby girl : बॉलीवूडमधील फेमस जोडपं आईबाबा झालंय. अभिनेत्री दिपीका पदुकोन आणि रणवीर सिंहने त्यांच्या मुलीचं स्वागत केलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : बॉलीवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री दिपीका पदुकोनने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. गणेशोत्सवाच्या शुभ पर्वात दिपीका पदुकोन आणि रणवीर सिंह यांनी मुलीचं स्वागत केलंय. दीपिका पदुकोण आई झाली आहे. तिने आज मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

दीपिकानं दिला गोंडस मुलीला जन्म

यावेळी अभिनेता रणवीर सिंग तिच्यासोबत होता. त्यांच्या व्यतिरिक्त, प्रसूतीवेळी त्यांचे दोन्ही कुटुंबीयही रुग्णालयात उपस्थित (Deepika Padukone Ranveer Singh) होते. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ज्याची गेल्या नऊ महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर आज उगावला आहे. दीपिका पदुकोण रविवारी आई झाली. शनिवारी संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

६ वर्षानंतर दीपिका-रणवीर आई बाबा झाले

ऋषी पंचमीच्या निमित्ताने दीपिका-रणवीरने त्यांच्या मुलीचं स्वागत केलंय. गणेशोत्सवाच्या शुभ पर्वात दिपीका आई बनली (Bollywood News) आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर दीपिका-रणवीर आई बाबा झाले आहे. ही गोड बातमी समोर येताच त्यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दीपिकाने सी-सेक्शनद्वारे मुलीला जन्म दिल्याची माहिती मिळत आहे. घरात बाळ आल्यामुळे दोन्ही कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

प्रतिक्षा संपली

दीपिका (Deepika Padukone) मागील दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर पती रणवीर सिंगसोबत दिसली होती. तिने पतीसह बाप्पाचे आशीर्वाद घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दीपिका आणि रणवीर हॉस्पिटलच्या बाहेर दिसले (Ranveer Singh) होते. मागील नऊ महिन्यांपासून दीपिका आणि रणवीर त्यांच्या छोट्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT