Deepika Padukone-Vicky kaushal  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika -Vicky : 'कल्की'मधून एक्झिट होताच दीपिका पादुकोणचं नशीब चमकले, विकी कौशलसोबत 'महावतार'मध्ये झळकणार? वाचा मोठी अपडेट

Deepika Padukone In Mahavatar : बॉलिवूडची मस्तानी विकी कौशलच्या 'महावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोले जात आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

विकी कौशल आणि दीपिका पादुकोण एकत्र काम करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

विकी कौशलच्या 'महावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत दीपिका पादुकोण झळकणार असल्याचे बोले जात आहे.

'महावतार' हा पौराणिक ड्रामा आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल अलिकडेच बाबा झाला आहे. कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे विकी आणि कतरिना नवीनच पालक झाले आहेत. 'छावा' विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. 'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या विकी कौशल त्याचा आगामी चित्रपट 'महावतार'मुळे चांगलाच चर्चेत आहे.

'महावतार' चित्रपट 2026 च्या ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खूप काळापासून विकी कौशलसोबत 'महावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार ही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण 'महावतार'मध्ये (Deepika Padukone-Vicky kaushal ) मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. पहिल्यांदाच विकी कौशल आणि दीपिका पादुकोण स्क्रीन एकत्र शेअर करणार आहे.

अलिकडेच दीपिका पादुकोण मुंबईतील मॅडॉक फिल्म्सच्या कार्यालयात दिसली. मिड-डेच्या वृत्तानुसार, 'महावतार' चित्रपटाचे निर्माते बऱ्याच काळापासून अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जी, परशुरामाच्या भूमिकेत गांभीर्य आणि भावनिक खोलता आणू शकेल. चित्रपटात मुख्य भूमिकेत सक्षम स्त्री पात्र हवे आहे. दीपिका आणि निर्मात्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'महावतार' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत. 'महावतार' हा पौराणिक ड्रामा आहे. जो भगवान परशुरामच्या कथेवर आधारित आहे. चाहते दीपिका पादुकोण आणि विकी कौशलला एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. विकी कौशलचा लवकरच 'लव्ह अँड वॉर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग, कल्याण ते लातूर प्रवास फक्त ४ तासांत; काय आहे सरकारचा प्लान?

Maharashtra Live News Update: लोकनेते मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उसळणार अलोट गर्दी

"बाबुराव को गुस्सा क्यू आता है"? पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणखी एक व्हिडिओ अन् पुन्हा गुन्हा, वाचा प्रकरण

Hrithik Roshan On Dhurandhar: अक्षय खन्नाच्या धुरंधरमधील ही गोष्ट हृतिक रोशनला खटकली, म्हणाला - 'मी सहमत नाही...'

पुण्यात ५३२ कोटींचा प्रोजेक्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, वाचा नेमका प्लान आहे तरी काय

SCROLL FOR NEXT