Girija Oak : 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकच्या गोड आवाजावर चाहते फिदा; 'त्या' VIDEOवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Girija Oak Singing Video : 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा एक सुंदर गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून चाहते तिच्या आवाजावर फिदा झाले आहेत.
Girija Oak Singing Video
Girija Oaksaam tv
Published On
Summary

सध्या सर्वत्र 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकची चर्चा पाहायला मिळत आहे.

गिरीजा ओकचे चाहते अभिनयासोबत तिच्या गाण्याच्याही प्रेमात पडले आहे.

गिरीजा ओकने आजवर मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक (National Crush Girija Oak Godbole ) तिच्या निळ्या साडीतील फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. चाहते तिच्या बद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. अलिकडेच तिने समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केले होते. ज्यावर चाहत्यांनी भरपूर प्रेम दाखवले. आता देखील गिरिजा ओकचा असाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे. जे पाहून चाहते वेडे झाले आहेत.

'फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला अभिनेता शरीब हाश्मीने नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरीब हाश्मी अभिनेत्यासोबत एक उत्तम लेखक आणि गायक देखील आहे. त्यांने नुकताच 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघेही सुरेल आवाजात गाताना दिसत आहे. गिरीजा ओकचा आवाज, गाण्यातील सुर आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून चाहते भारावून गेले आहेत.

गिरीजा ओक आणि शरीब हाश्मी यांनी 90 च्या काळातील जुने मराठी गाणे गायले आहे. गाण्याचे नाव- "रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना..." हे लोक प्रसिद्ध गाणे दिग्गज गायिका आशा भोसले यांनी गायले आहे. आजही हे गाणे सोशल मीडियावर तुफान ट्रेंड करत आहे. गिरीजा ओकला आधीपासून गाण्याची खूप आवड आहे. तिने 'सिंगिंग स्टार' या शोमध्ये देखील भाग घेतला होता.

गिरीजा ओक आणि शरीब हाश्मी यांच्या या सुरेल गाण्याच्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अमृता खानविलकरने कमेंट केली की, "OMG कमाल" अशाच अनेक कौतुक करणाऱ्या कमेंट्स व्हिडीओवर येत आहे. व्हिडीओत गिरीजा ओकचा नो मेकअप लूक दिसत आहे. सुंदर कुर्ती तिने परिधान केली आहे. मोकळ्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Girija Oak Singing Video
Ramayana-Ranbir Kapoor : रणवीर कपूरचा 'रामायण' चित्रपट अरबी भाषेतही येणार; टीझर आला समोर, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com