Ramayana-Ranbir Kapoor : रणवीर कपूरचा 'रामायण' चित्रपट अरबी भाषेतही येणार; टीझर आला समोर, पाहा VIDEO

Ramayana In Arabic Language : रणवीर कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'रामायण' संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. 'रामायण' चित्रपट अरबी भाषेतही पाहता येणार आहे.
Ramayana In Arabic Language
Ramayana-Ranbir Kapoor saam tv
Published On
Summary

रणवीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रामायण' मुळे चांगला चर्चेत आहे.

'रामायण' चित्रपट अरबी भाषेतही येणार आहेत.

'रामायण' मध्ये रणवीर कपूर रामाच्या भूमिकेत झळकणार आहे.

बहुप्रतीक्षित 'रामायण' (Ramayana) चित्रपटाचे मोठे अपडेट समोर आले आहेत. 'रामायण' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे. 'रामायण' चित्रपटात मुख्य भूमिकेत रणबीर कपूर झळकणार आहे. 'रामायण' चित्रपट आता अरबी भाषेतही पाहायला मिळणार आहे. यासंबंधित खास व्हिडीओ समोर आला आहे.

'रामायण' चित्रपटाचा अरबी भाषेतील टीझर मंगळवारी वर्ल्ड ऑफ रामायण या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अरबी भाषेतील मजकूर पाहायला मिळत आहे. 'रामायण' चित्रपट हिंदी सोबत बंगाली, मराठी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, इंग्रजी, चिनी, जपानी आणि स्पॅनिशसह सुमारे 45-50 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'रामायण' बजेट किती?

रणबीर कपूर हा 'रामायण' चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण' चित्रपटाचे बजेट 1600 कोटी रुपये आहे. पहिल्या भागासाठी 900 कोटी रुपये खर्च झाले असून दुसऱ्या भागासाठी 700 कोटी शिल्लक आहेत. 'रामायण' चित्रपट भारताच्या पौराणिक महाकाव्यावर आधारित आहे. 'रामायण' चित्रपटात ॲक्शन, मायथोलॉजी आणि भव्यतेचा संगम पाहायला मिळणार आहे.

'रामायण' रिलीज डेट

'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (राम) आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची (सीता) जोडी पाहायला मिळणार आहे.

'रामायण' चित्रपटात साऊथ अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. रवि दुबे लक्ष्मणची भूमिका तर शीबा चड्ढा मंथराची भूमिका साकारणार आहे.

Ramayana In Arabic Language
Dhurandhar Collection : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 200 कोटींच्या उंबरठ्यावर, ५व्या दिवशी कमाई किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com