Bhumi Pednekar Birthday Saam TV
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar Birthday : करियरच्या सुरूवातीला भूमी पेडणेकरने नाकारलेले २४ चित्रपट, नेमकं कारण काय ?

Bhumi Pednekar Struggle Story : अभिनेत्री भूमी पेडणेकरने २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण तिच्या अभिनयामुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.

Chetan Bodke

अभिनेत्री भूमी पेडणेकरने २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण तिच्या अभिनयामुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. तिने बॉलिवूड डेब्यू करताच लोकं तिच्याबद्दल खूप काही गोष्टी बोलू लागले. पण तिने कोणालाही प्रत्युत्तर न देता, आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांचेच तोंड बंद केले. भूमीने आज बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. आज भूमी पेडणेकरचा ३४ वा वाढदिवस आहे. मुळची मुंबईकर असलेल्या भूमीने आपलं सर्व शिक्षण मुंबईतूनच पुर्ण केले. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ.

अभिनेत्री होण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये सहाय्यक कास्टिंग डायरेक्टर म्हणून ६ वर्षे काम केले. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या, भूमीने 'दम लगा के हैशा'मधून बॉलिवूड डेब्यू केले. या चित्रपटाच्या माध्यमातून भूमीला अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने एका सर्वसामान्य गृहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या ह्या पहिल्याच चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात आयुष्मान खुरानानेही मुख्य भूमिका साकारली होती.

भूमीचे वडील सतीश मोतीराम पेडणेकर हे १९८० ते १९८५ पर्यंत राज्याचे माजी गृह आणि कामगार मंत्री होते. २०११ मध्ये तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. त्यावेळी भूमी अवघ्या १८ वर्षांची होती.

मीडिया रिपोर्टनुसार, भूमीने तिच्या पहिल्या चित्रपटासाठी १२ किलो वजन वाढवले ​​होते आणि त्यानंतर तिने ३० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले होते. पहिल्याच चित्रपटातील एका सर्वसाधारण गृहिणीची भूमिका साकारल्यानंतर तिच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक केले गेले. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूमीने तिचा पहिला चित्रपट तब्बल ४५ वेळेस पाहिला होता.

'दम लगा के हैशा' नंतर, भूमीने 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभमंगल सावधान', 'बाला', पती पत्नी और वो', 'सांड की आँख' आणि 'बधाई दो' यांसह अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'बधाई दो'साठी भूमी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 'फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड' मिळाला. भूमीने तिच्या फिल्मी करियरमध्ये, आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि अक्षय कुमार यांच्यासोबत बहुतेक चित्रपट केले आहेत. 'दम लगा के हैशा'ला तब्बल 11 वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. 'थँक्स फॉर कमिंग'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहे. तर 'बाला'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचाही पुरस्कार मिळाला.

‘दम लगा के हैशा’नंतर भूमी पेडणेकरला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. पण, अनेक चित्रपटांचे कथानक न आवडल्यामुळे त्यासोबतच तिच्या आणि शुटिंगच्या तारखा न जुळल्यामुळे तिने करिअरच्या सुरुवातीलाच २४ चित्रपट नाकारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT