Jiya Shankar Buys New BMW Luxury Car Instagram
मनोरंजन बातम्या

Jiya Shankar Buys New Car: बिग बॉस मधून बाहेर येताच जिया शंकर झाली मालामाल; अभिनेत्रीने खरेदी केली अलिशान कार, किंमत ऐकुन थक्क व्हाल

Jiya Shankar News: ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या टॉप ५ मधुन जिया शंकर घराबाहेर येताच आपल्या चाहत्यांना तिने गुड न्यूज दिली आहे.

Chetan Bodke

Jiya Shankar Buys New BMW Luxury Car: टेलिव्हिजनप्रमाणे आता ओटीटीवरही बिग बॉस रिॲलिटी शो ठरला आहे. सध्या जिओ सिनेमावर ‘बिग बॉस ओटीटी २’ हा शो सुरू असून प्रेक्षकांमध्ये शोची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवरच ‘बिग बॉस ओटीटी २’चा ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या टॉप ५ मधुन जिया शंकर घराबाहेर पडली आहे. अभिनेत्रीने घराबाहेर येताच आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. जिया शोमधून बाहेर येताच एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’ मधून बाहेर पडताच तीनच दिवसातच जिया शंकरने नवीन कार घेतली आहे. सध्या अभिनेत्रीचा हा नव्या कारसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने एक आलिशान बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. यामध्ये जिया नारळ फोडताना आनंदात दिसतेय. तर, तिची आई आरती करताना दिसत आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’च्या पहिल्या दिवसापासून जिया शंकर बरीच चर्चेत आहे. अनेकांनी तिला तिच्या खेळावरून ट्रोल केले आहे. अभिनेत्रीनी नवीन कार घेतल्यापासून सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, जिया आधी नवीन गाडीवरचा पांढरा पडदा बाजुला काढताना दिसत आहे. त्यानंतर पुढे ती ‘हर हर महादेव’ म्हणत नारळ फोडताना दिसते. आणि नंतर पुढे, तिची आई फुलांनी सजवलेल्या आरतीच्या ताटाने ओवाळत गाडीच्या बोनटला हार घालून तिची आरती करताना दिसते. सोबतच तिने यावेळी माध्यमकर्मींना पेढे देऊन तोंड देखील गोड केलं आहे. जिया शंकरच्या नव्या कोऱ्या BMW X1 कारची किंमत 45 ते 50 लाख रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

जिया शंकरच्या कारचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. एक नेटकरी अभिनेत्रीला म्हणतो, 'बिग बॉस ओटीटी 2' च्या कमाईतून नवीन कार खरेदी केलीय का? तर आणखी एक युजर म्हणतो, खूप कमी वयात उत्तम कामगिरी केलीत, अभिमानाची गोष्ट, तू खरोखरच स्टार आहेस. तर आणखी एकजण म्हणतो, 'तुला स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही.' तर आणखी एकाने प्रतिक्रिया देत म्हणाला, 'आत्मनिर्भर आणि एक अशी मुलगी जी स्वत:च्या बळावर इथपर्यंत पोहोचली. खूप अभिमान.' एकुणच स्वतःच्या खेळाने बिग बॉस गाजवल्यावर जिया आता पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’चा फिनाले रविवारी नाही तर सोमवारी पहिल्यांदाच होत आहे. शोच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये पूजा भट्ट, मनीषा राणी, बाबिका धारवे, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांचा समावेश आहे. आतापर्यंत पुनित सुपरस्टार, अविनाश सचदेव, सायरस ब्रोचा, आलिया सिद्दीकी, पलक पुरस्वानी, आकांक्षा पुरी, जिया शंकर, जेडी हदीद आणि फलक नाज हे स्पर्धक घराच्या बाहेर. या सीझनमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT