Jawan Film Clips Stolen And Leaked Online: ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वी टीझर आणि चित्रपटातलं पहिलं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं होतं. शाहरूखच्या ‘पठान’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अशातच चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत असताना, चित्रपटाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली. चित्रपटाच्या काही व्हिडीओ क्लिप्स चोरीला गेल्या असून त्या ऑनलाईन लीक झाल्याची माहिती मिळत आहे. नुकतंच या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत मुंबईतल्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये १० ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, रेड चिलीज एंटरटेनमेंटने ‘जवान’मधील काही क्लिप चोरून कॉपीराइटचे उल्लंघन करत सोशल मीडियावर त्या क्लिप्स शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ लीक करणाऱ्या पाच ट्विटर हँडलची ओळख पटली असून त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, एकाच ट्विटर हँडलने त्या नोटीसवर उत्तर दिलं आहे.
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान इतर कर्मचाऱ्यांना चित्रीकरणाची परवानगी नसताना देखील अनधिकृतरीत्या शूटिंग करून चित्रफिती व्हायरल केल्या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकदा चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शाहरुख खानचा हा जवान बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच काश्मीर मध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत शाहरुख खान दिसला होता.
चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन एटली यांनी केले असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत शाहरुख खान सोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि रिद्धी डोगरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.