IFFM 2023 मध्ये साऊथ सिनेमांचा डंका; एका क्लिकवर जाणून घ्या विजेत्यांची यादी

IFFM 2023 Awards Winner List: इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये फक्त बॉलिवूडच नाही, तर साउथ चित्रपटांचाही समावेश आहे. यासोबतच अनेक ओटीटी वेबसीरीजलाही गौरविण्यात आले.
IFFM 2023 Awards Winner List
IFFM 2023 Awards Winner ListInstagram
Published On

IFFM 2023 Awards Winner List: भारतीय चित्रपटांची लोकप्रियता संपूर्ण जगभर आहे. भारतीय चित्रपटांना जगभरातील अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला जातो. शुक्रवारी ऑस्ट्रेलियात इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न हा सोहळा पार पडला. यामध्ये अनेक भारतीय चित्रपटांना गौरविण्यात आले. इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये फक्त बॉलिवूडच नाही, तर साउथ चित्रपटांचाही समावेश आहे. यासोबतच अनेक ओटीटी वेबसीरीजलाही गौरविण्यात आले.

IFFM 2023 Awards Winner List
Jawan Clips Viral: शाहरूख खानच्या ‘जवान’ची क्लिप चोरीला, FIR दाखल

विजेत्यांच्या यादित दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरच्या 'सीता रामम' या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. तर शाहरुख खानच्या 'पठान'ला पीपल्स चॉईस हा अवॉर्ड मिळाला. राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्व्हे'साठी बेस्ट परफॉर्मन्स फिमेल अवॉर्ड देण्यात आला. तर विजय वर्माच्या 'दहाड' या वेबसीरीजला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला.

चित्रपटातील योगदानासाठी करण जोहरला सन्मानित कण्यात आले. तर कार्तिक आर्यनला भारतीय चित्रपटांचा ग्लोबल सुपरस्टार म्हणून गौरवण्यात आले. विशेष गटासाठी भूमी पेडणेकरला अवॉर्ड देण्यात आला. तिला 'डिसरप्टर ऑफ द इयर' हा किताब देण्यात आला.

पुरस्कारांची यादी

सर्वोत्कृष्ट माहितीपट - टू किल अ टायगर

सर्वोत्कृष्ट इंडि चित्रपट - आग्रा

सर्वोत्कृष्ट अभिनय चित्रपट (पुरुष)- मोहित अग्रवाल, आग्रा

सर्वोत्कृष्ट अभिनय चित्रपट (महिला)- राणी मुखर्जी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- पृथ्वीराज कोनानूर, हेडिलेंटू

सर्वोत्कृष्ट चित्रपट सीता रामम

सर्वोत्कृष्ट सीरीज कामगिरी पुरुष- विजय वर्मा,दहाड

सर्वोत्कृष्ट सीरीज कामगिरी (महिला)- राजश्री देशपांडे, ट्रायल बाय फियर

सर्वोत्कृष्ट सीरीज- ज्युबिली

IFFM 2023 Awards Winner List
Sridevi Doodle News: श्रीदेवीच्या आठवणीत गुगलही रमलं; डुडलमधून दाखवली चित्रपटांची खास झलक

या कलाकारांना खास पुरस्कार प्राप्त

करण जोहरच्या २५ वर्षाच्या इंडस्ट्रीतील योगदानासाठी खास अवॉर्ड देण्यात आला आहे.

इक्वॅलिटी इन सिनेमा अवॉर्ड - डार्लिंग्ज

पीपल्स चॉइस पुरस्कार - पठान

रायझिंग ग्लोबल सुपरस्टार - कार्तिक आर्यन

डायव्हर्सिटी इन सिनेमा अवॉर्ड - मृणाल ठाकूर

डिसरप्टर अवॉर्ड - भूमी पेडणेकर

रेनबो स्टोरीज अवॉर्ड - ओनिर, पाइन कोन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com