Vivek Oberoi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi : धनत्रयोदशी अन् लग्नाचा वाढदिवस; विवेक ओबेरॉयनं दिलं बायकोला खास गिफ्ट, पाहा PHOTO

Vivek Oberoi New House : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने नवीन घर घेतले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याने आपल्या बायकोला हे गिफ्ट दिलं आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याला 'साथिया' या चित्रपटातून खरी लोकप्रियता मिळवली. विवेक ओबेरॉयचे शूटआउट ॲट लोखंडवाला, साथिया, मस्ती हे चित्रपट खूप गाजले आहेत.

सध्या विवेक ओबेरॉयचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. विवेकने धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. त्यात अजून एक विशेष गोष्ट म्हणजे काल (२९ ऑक्टोबर) विवेक ओबेरॉयच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विवेकने आपल्या बायकोला ही खास भेटवस्तू दिली आहे. त्यांच्या लग्नाल तब्बल 4 वर्ष पूर्ण झाली आहेत.

नवीन घर घेतल्याची बातमी विवेक ओबेरॉयने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. त्यांनी नवीन घरात बायकोसोबत पूजेला बसल्याचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी एक हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "14 वर्षांपूर्वी, आज धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी आम्ही आमच्या नवीन घरात जात आहोत. देवाची कृपा आणि वडिलांचे आशीर्वाद पाठी आहेत. तसेच फॅन्सीचा पाठिंबाही आहे. माझ्यासाठी तू माझे 'घर' आहेस आणि तूच माझे 'हृदय' आहे . लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!" त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी विवेक ओबेरॉयला नवीन घरासाठी आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

नवीन घराच्या पूजेसाठी विवेक ओबेरॉयने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे तर पत्नी प्रियांकाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. फोटोंमध्ये दोघही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grahan Dosh: 6 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या अडचणी वाढणार; 18 वर्षांनंतर राहू-चंद्र बनवणार अशुभ ग्रहण योग

Kendra Yog 2025: 3 सप्टेंबरपासून 'या' राशींना मिळणार प्रत्येक कामात यश; बुध-युरेनस बनवणार पॉवरफुल योग, पैसाही येणार

Raj Thackeray: ना आमदार ना खासदार तरीही राज ठाकरेंच्या घरचा गणपती ठरलाय वजनदार; कसा? वाचा सविस्तर

Obesity prevention: भारतीयांमध्ये वाढतेय लठ्ठपणाची समस्या; आरोग्य मंत्रालयाने दिल्या धोका कमी करण्याच्या सोप्या टीप्स

Friday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, आरोग्यासाठी पैसा खर्च होणार; ५ राशींच्या लोकांना सावध राहावे लागणार

SCROLL FOR NEXT