Vivek Oberoi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून डोळे भिरभिरतील

Vivek Oberoi New Car : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकतीच नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. त्याने गाडीची पहिली झलक सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून दाखवली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi ) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपट आजवर दिले आहेत. सध्या विवेक एक आलिशान आयुष्य जगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विवेक दुबईला स्थायिक आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. आपल्या कुटुंबाला त्याने रोल्स रॉयस हे आलिशान गाडी घेऊन सरप्राईज दिले आहे. याचा एक छान व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विवेकने सिल्व्हर ग्रे रंगाची रोल्स रॉयस आलिशान गाडी खरेदी केली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाडीला पाहून विवेकचे आई-बाबा, पत्नी यांना आनंद झाला आहे.

नव्या कारमध्ये बसून ओबेरॉय कुटुंब एकत्र ड्राइव्हवर जातात. विवेक नव्या गाडीची किल्ली सर्वात प्रथम वडिलांच्या हातात देतो. विवेकचे आई-वडील त्याचे कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.

विवेकने शेअर केलेल्या या स्पेशल व्हिडीओला त्याने खास कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं की, "आयुष्यात कोणत्याही स्वरुपात यश येते. आज माझे यश असे दिसत आहे. माझ्या कुटुंबासोबतचा हा भाग्याचा क्षण" त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहते आणि कलाकर त्याला शुभेच्छा देत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विवेकने Rolls Royce Cullinan Black Badge ही गाडी खरेदी केली असून याची किंमत 12.25 कोटी एवढी आहे.

अलिकडेच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विवेकने नवीन घर खरेदी केले आणि आता आलिशान कार खरेदी केली आहे. २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कंपनी' चित्रपटातून विवेक ओबेरॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT