Bitcoin : बिटकॉइन म्हणजे नेमके काय? त्याची किंमत इतकी का वाढली?

Cryptocurrency in Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारण सध्या बिटकॉइनची जोरदार चर्चा सुरु आहे. बिटकॉइन म्हणजे काय? याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात...
Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय ?; जाणून घ्या
Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय ?; जाणून घ्या Saam Tv
Published On

(cryptocurrency Bitcoin : ९२ हजार डॉलरहून अधिक किंमत असलेल्या बिटकॉइनची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणातही सुरू झाली. निवडणुकीच्या रणधुमाळीत याच बिटकॉइनवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.प्रत्यक्ष चलनात नसलेल्या आभासी चलन म्हणजेच बिटकॉइन नेमकं काय आहे, त्याची किंमत वैश्विक बाजारात इतकी झपाट्याने का वाढते, त्याचे व्यवहार कसे होतात, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

क्रिप्टोकरन्सीच्या जगात बिटकॉइनच्या किमतीने पुन्हा एकदा गर्जना केली आणि आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. ट्रेडिंग सत्रादरम्यान, बिटकॉइनची किंमत प्रथमच 94 हजार डॉलर्सवर दिसून आली. ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनच्या किमतीत 26 हजार डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आता लवकरच बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलरच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सीला मार्कियाला ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. यावर इलॉन मस्क यांचेही समर्थन होत आहे. क्रिप्टोकरन्सी तसेच बिटकॉईन म्हणजे काय आणि ते कसे काम करते ते जाणून घेऊया.

बिटकॉइन काय आहे?

बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे ज्याला इंग्रजीत डिजीटल करन्सी म्हणतात. हे 2009 मध्ये सुरू झाले होते, जे हळूहळू इतके लोकप्रिय झाले आहे की एका बिटकॉइनची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याला क्रिप्टोकरन्सीही म्हणतात, कारण पेमेंटसाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. म्हणजेच आता या चलनाला भविष्यातील चलनही म्हणता येईल.

बिटकॉईनचा व्यवहार कसा होतो?

बिटकॉइनचा व्यवहार करण्यासाठी, ग्राहकाला खाजगी कीशी जोडलेल्या डिजिटल माध्यमांद्वारे पेमेंट संदेश पाठवावा लागतो, जो जगभरात पसरलेल्या विकेंद्रित नेटवर्कद्वारे सत्यापित केला जातो म्हणजेच व्हेरीफाय केला जातो.

याद्वारे केलेले पेमेंट डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटपेक्षा वेगळे आहे. बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे, जे फक्त ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाते. बिटकॉइनच्या मूल्यातील प्रचंड चढउतारांमुळे, ते चलन म्हणून कार्य करण्यास सक्षम आहे की नाही असा प्रश्न अनेकदा उद्भवतो.

ॲपच्या माध्यमातून बिटकॉईनचा व्यव्हार करणे शक्य आहे. मात्र यात तुमचा पासवर्ड ही महत्त्वाची भूमीका बजावतो. समजा तुमची फाइल सर्व्हरवरून डिलीट झाली किंवा तुमचा पासवर्ड चुकीचा झाला, तर समजा तुमचे पैसे कायमचे गमावले आहेत. अलीकडेच असे अहवाल आले होते की काही लोकांकडे पासवर्ड नसल्यामुळे लाखो किमतीचे बिटकॉइन गमावले आणि ते विसरले.

भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्रीसाठी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होती

क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन विधेयक, 2019 वर बंदी घालण्याच्या मसुद्यात, देशात क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल असा प्रस्ताव होता. मसुद्यानुसार, जे लोक क्रिप्टोकरन्सी तयार करतात, ती विकतात, क्रिप्टोकरन्सी ठेवतात, ती कुणाला पाठवतात किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार करतात ते सर्व लोक त्याच्या अधिकारक्षेत्रात येतील. या सर्व प्रकरणात दोषी आढळलेल्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी हटवली आहे.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com