Vijay Raaz  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Raaz : विजय राजला दिलासा, लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय?

Vijay Raaz Case : बॉलिवूड अभिनेता विजय राजची लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विजय राज (Vijay Raaz ) याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. विजय राज याची नुकतीच लैंगिक छळाच्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटात विजय राज याने काम केले आहे. तेव्हा चित्रपटाच्या सेटवर एका सहकाऱ्याने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र आता विजय राज याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ही घटना 2020मध्ये घडली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्याने सर्व कलाकार मध्य प्रदेशातील बालाघाट येथे हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा एका क्रू मेंबरने विजय राजवर विनयभंग केल्याच्या आरोप केला. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलीसांनी अटक केली. मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. तेव्हापासून ही केस न्यायालयात सुरू आहे.

विजय राजवर केलेले सर्व आरोप कोर्टाने रद्द केले आहे. गोंदिया मॅजिस्ट्रेट कोर्टाने आपला निर्णय सांगितला आहे. विजय राज यांच्या वकीलांना दिलेल्या माहितीनुसार, 'शेरनी' चित्रपटाचे नागपूरजवळ शूटिंग सुरू होते. त्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुळे त्यांना अर्ध्यावर शूटिंग सोडावे लागले. त्यानंतर त्यांना चित्रपटात जास्त काम देखील मिळाले नाही. मात्र आता कोर्टाने त्याला निर्दोष घोषित केले आहे.

गोंदियाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महेंद्र सोते म्हणाले की, अभिनेत्याविरुद्ध पुरेसे पुरावे सादर करण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरला. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४-अ (लैंगिक छळ) आणि ३५४-ड (पाठलाग) अंतर्गत सर्व आरोप रद्द केले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, विजय राजने महिलेच्या दिसण्याबद्दल टिप्पणी केली होती. यावरून हा वाद सुरू झाला होता. आता चार ते साडे चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे. विजय राज याचे 'स्त्री', 'गली बॉय', 'गंगुबाई काठियावाडी', 'भूल भुलैया ३'यांसारखे अनेक चित्रपट आहेत. त्याने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT