Murder in Mahim Trailer : सीरियल किलरच्या शोधात विजय राज आणि आशुतोष राणा, 'मर्डर इन माहीम' सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

Murder in Mahim Trailer : आशुतोष राणा आणि विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर ‘मर्डर इन माहिम’ वेबसीरीजचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे.
Murder in Mahim Trailer
Murder in Mahim TrailerSaam Tv

आशुतोष राणा आणि विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर ‘मर्डर इन माहिम’ वेबसीरीजचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. २०१३ मध्ये मुंबईतल्या माहिममध्ये झालेल्या एका मर्डरवर आधारित वेबसीरीजचे कथानक आहे. खुर्चीला खिळवून ठेवलेल्या कथानकाची आणि कलाकारांच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधलेय. (Bollywood)

Murder in Mahim Trailer
Salman Khan House firing Case : आरोपीच्या मृत्यूबाबत आईला वेगळाच संशय; हायकोर्टात याचिका

या वेबसीरिजमध्ये विजय राज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे तर आशुतोष राणा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या अनेक बॉलिवूड वेबसीरीजमध्ये, मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. त्याप्रमाणेच या वेबसीरीजमध्येही काही मराठी कलाकारांचा समावेश आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला शिवाजी साटम आणि भारत गणेशपुरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. (Web Series)

एका हत्येवर आधारित वेबसीरीजचे कथानक आहे. एका हत्येचं गुढ पोलिस कशा पद्धतीने उकलतात ? हे आपल्याला वेबसीरीज पाहिल्यावरच कळेल. २०१३ मध्ये माहिममध्ये झालेल्या मर्डरवर आधारित वेबसीरीजचे कथानक आहे. 'मर्डर इन माहीम' येत्या १० मे पासून JioCinema या ओटीटी ॲपवर स्ट्रीम होणार आहे.

JioCinemaने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या वेबसीरीजचा ट्रेलर शेअर केला आहे. वेबसीरीजसाठी चाहते उत्सुक असून ४७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो व्ह्यूज आहेत. (Entertainment News)

Murder in Mahim Trailer
Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com