Irina Rudakova : 'बिग बॉस' फेम 'परदेसी गर्ल'चं नशीब फळफळलं; Housefull 5 मध्ये अक्षय कुमारबरोबर झळकली, पाहा VIDEO

Irina Rudakova Work In Housefull 5 : 'बिग बॉस मराठी 5' फेम अभिनेत्री इरिना रुडाकोवा 'हाऊसफुल 5' मध्ये झळकली आहे. तिची झलक चित्रपटाच्या नवीन गाण्यात अक्षय कुमारसोबत दिसत आहे.
Irina Rudakova Work In Housefull 5
Irina RudakovaSAAM TV
Published On

सध्या सर्वत्र 'हाऊसफुल 5' ची (Housefull 5 ) चर्चा पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चनचा 'हाऊसफुल 5' लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रेंचाइजीची पाचवा भाग आहे. 'हाऊसफुल 5' चा टीझर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

'हाऊसफुल 5' चित्रपटातील 'लाल परी' गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. आता चित्रपटातील 'दिल ए नादान' (Dil E Nadaan ) गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षय कुमार, नर्गिस, सोनम बाजवा, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन आणि जॅकलिन पाहायला मिळत आहेत. या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यात 'बिग बॉस मराठी 5' फेम अभिनेत्री पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा (Irina Rudakova) आहे.

इरिना रुडाकोवा अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar ) गाण्यात रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. इरिनाला मोठ्या पडद्यावर काम करण्याची ही उत्तम संधी मिळाली आहे. इरिनाच्या चाहत्यांना तिला अक्षय कुमार सोबत पाहून खूपच आनंद झाला आहे. या गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. इरिना रुडाकोवाने आपल्या बिग बॉसमधील गेमने प्रेक्षकांना भुरळ घातली. बिग बॉसनंतर इरिना रुडाकोवा अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारताना दिसली.

'हाऊसफुल 5' मध्ये इरिना रुडाकोवा कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे. इरिना रुडाकोवाने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Irina Rudakova Work In Housefull 5
Raid 2 Box Office Collection : अजय देवगणच्या 'रेड 2'नं अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ला टाकलं मागे, कलेक्शनचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com