Sushant Singh Rajput Death Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला चार वर्ष पूर्ण, टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती अभिनयाला सुरुवात

Sushant Singh Rajput Career Journey: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. जरीही सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी तो चाहत्यांच्या मनात चित्रपटांच्या माध्यमातून आहे.

Chetan Bodke

आज दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. जरीही सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी त्याचे चाहते त्याला विसरू शकले नाहीयेत. सुशांतने १४ जून २०२० रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमकी सुशांतने का आत्महत्या केली या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे.. दरम्यान, हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांसह त्याचे कुटुंबीयही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

सुशांतची आज चौथी डेथ एनिवर्सरी आहे. यानिमित्त त्याचे अनेक मित्र, कुटुंबीय आणि चाहते त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. सुशांतने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सगळ्यांची मने जिंकली आहेत. तो कायमच आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. सुशांत सिंग नेहमीच एक हसमुख व्यक्तीमत्व म्हणून चाहत्यांमध्ये फेमस होता. सुशांतचे आडनाव राजपूत नाही तर 'गुलशन' आहे. ही गोष्ट अनेकांना माहित नाही. सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी पाटणामध्ये झाला. सुशांतच्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ त्याच्या वडिलांनीच केला. सुशांत त्याच्या कुटुंबात सर्वात लहान होता. त्याला एकूण चार बहिणी आहेत.

सुशांतने आपल्या सिने करियरची सुरुवात टेलिव्हिजन सीरियलमधून केली. २००८ मध्ये स्टार प्लसवरील रोमँटिक ड्रामा 'किस देश में है मेरा दिल' हा त्याचा पहिला शो होता. त्यानंतर सुशांतला झी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'पवित्र रिश्ता'ने प्रसिद्धी दिली. त्यानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'काय पो चे' या चित्रपटातून सुशांतने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर सुशांत 'शुद्ध देसी रोमान्स', 'पीके', 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी' सारख्या अनेक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये त्याने महेंद्रसिंग धोनीची मुख्य भूमिका साकारली होती, ती भूमिका सर्वांनाच आवडली होती. सुशांत शेवटचा २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल बेचारा’ चित्रपटात दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Mirchi Bhaji: कुरकुरीत अन् झणझणीत मिरची भजी बनवण्याची सोपी ट्रिक;लगेच करा ट्राय

Liver Failure: कमी झोप अन् सतत थकवा जाणवतोय? असू शकतात लिव्हर फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Honymoon Destination: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

महिला विश्वचषकात भारताचा विजय, जेमिमा रॉड्रिग्ज वडिलांना मिठी मारून रडली, मुंबईच्या लेकीचा भावुक क्षणाचा VIDEO

SCROLL FOR NEXT