Sushant Singh Rajput News: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी जगाला अलविदा केलं. सुशांतच्या अचनाक जाण्यानं जसा त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला, तसाच धक्का त्याच्या लाखो चाहत्यांना बसला. सुशांतच्या आत्महत्येला आज तीन वर्ष पूर्ण होत असून त्याच्या आत्महत्येमागील अनेक प्रश्नांची उकल आजही झालेली नाही...
प्रत्येक व्यक्तीसोबत दिलखुलास पद्धतीने जगणाऱ्या सुशांतने आत्महत्या करण्याचा इतकं टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरित आहे. आत्महत्येपूर्वी सुशांतला कोणती चिंता भेडसावत होती? असा प्रश्न आजही सर्वांना पडलेला दिसून येतो. तो नेमका कोणत्या कारणामुळे नैराश्यात आला?, त्याच्या नैराश्याचे मुळ कारण काय? त्याच्या नैराश्याला नेमकं कोण कारणीभूत आहे? असा आजही सर्वांना प्रश्न पडतो. त्याच्या ‘एम.एस.धोनी’, ‘काय पो चे’ आणि ‘दिल बेचारा’ यासोबत काही चित्रपटातून त्याने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. आजही सुशांतचे चाहते त्याच्या चित्रपटांवर भरभरून प्रेम करतात. (Bollywood Actor)
सुशांतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येचा प्राथमिक तपास करणाऱ्या पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचं सुरुवातीला सांगितलं. त्याच्या आत्महत्येच्या तपासावर चाहत्यांनी ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुशांतच्या वडिलांसह परिवाराने सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती. याशिवाय अनेक राजकीय मंडळींनी ही हत्या असल्याचा दावा करत सीबीआय तपासाची मागणी केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला न्याय मिळावा अशी सर्वांचीच इच्छा होती. अखेर सरकारनंही सुशांतची केस सीबीआयच्या हातात सोपवली. त्या चौकशीत एक ड्रग्ज प्रकरण देखील उघडकीस आलं होतं.
केंद्र सरकारने सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय ५ ऑगस्ट २०२० मध्ये घेतला होता. १९ ऑगस्टलाही सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केला होता. या प्रकरणात सुशांतला न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना, सुशांतच्या आत्महत्येचा संशय रियाकडे गेला. आत्महत्येप्रकरणात चौकशीत ड्रग्ज रॅकेटदेखील उघडकीस आला.
ड्रग्ज रॅकेटच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आली होती. ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या अभिनेत्रींची नावे उघडकिस आली होती. २३ सप्टेंबरला एनसीबीने यांच्या विरोधात चौकशीचे समन्स पाठवले होते. परंतु यांच्याविरोधात चौकशीत कोणताही पुरावा मिळाला नाही.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय, एनसीबी, ईडी या तीन केंद्रीय यंत्रणा करत आहेत. त्यापैकी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी काय तपास केला, त्याचा निकाल काय आहे हे सर्वांना माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.