sohail Khan saamtv
मनोरंजन बातम्या

Sohail Khan: सोहेल- पुजाच्या प्रेमाची अधुरी कहाणी, 'या' कारणामुळे नात्यात कायमचा दुरावा...

गेल्या काही दिवसांपूर्वी सोहेलचा सीमासोबत घटस्फोट झाल्यामुळे बराच चर्चेत आहे.

Chetan Bodke

Sohail Khan: अभिनेता सोहेल खानचा आज ५२ वा वाढदिवस आहे. बॉलिवूड इंडस्ट्रितील सोहेलचा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता हा प्रवास बराच चर्चित होता. सोबतच त्याची ओळखही सलमानचा भाऊ म्हणून आहेच. गेल्या काही दिवसांपूर्वी सोहेलचा सीमासोबत घटस्फोट झाल्यामुळे बराच चर्चेत आहे.

सोबतच बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पुजा भट्टसोबतही त्याची चर्चा सुरु होती. दोघांनाही एकमेकांसोबत लग्नही करायचे होते. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही.पूजा भट्टने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती सोहेल खानवर खूप प्रेम करायची. सोहेल खानच्या कुटुंबीयांनाही ती खूपच आवडायची. पण तिचे सलमानसोबत काहीसे शाब्दिक मतभेद असल्याचेही तिने सांगितले होते.

सोबतच ती पुढे सांगते की, 'आम्हाला लग्न करायचे आहे पण सध्या सोहेल खाननेही त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे. मला आणखी दोन वर्षे चित्रपटात काम करायचे आहे.' दोघांमधील हे नाते तुटण्याचे कारण म्हणजे एक चित्रपट होता, चित्रपटाची शुटिंग सुरु झाली पण चित्रपटाची शुटिंग संपलीच नाही.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सोहेल खान करत होता. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा भट्ट सुद्धा होती. त्यावेळी सलीम खान या दोघांच्याही जोडीवरुन खूप संतापले होते त्यावेळी ते चित्रपटाच्या पूर्णपूर्ण विरोधात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलीम खान यांना पूजा भट्टचा बोल्डनेस, वादग्रस्त वक्तव्ये आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे त्रास व्हायचा.

सलमान खानने वडीलांसोबत बोलून त्यांची मनधरणी करत चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली. त्याचवेळी सोहेलचे पुजावर प्रेम जडले होते. चित्रपटाच्या वाढत्या बजेटमुळे चित्रपट अर्ध्यावरच थांबल्याची चर्चा सर्वत्र होत होती.

सलीम खान यांना सोहेल आणि पूजाच्या नात्याची माहिती मिळताच बऱ्याचदा भांडण झाले होते. शेवटी पूजा आणि सोहेलच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सलमानने खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीच निष्पन्न झाले नाही. आणि त्यामुळे चित्रपटाची शुटिंगही थांबवण्यात आली होती.

यामुळे दोन्ही कुटुंबांमधील नात्यातील दरी कमी व्हायचे नाव घेत नव्हते. पूजा भट्टही कधीच खान कुटुंबीयांच्या चित्रपटांमध्ये दिसली नाही तर आलिया भट्टही कधीच सलमान खानसोबत काम करताना दिसली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी या दोन्हीही कुटुंबातील निर्माण झालेली दरी आलिया भट्टच्या लग्नात दोन्हीही कुटुंब एकत्र आलेले दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT