Urfi Javed: उर्फीचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, 'या' आजारावर घेतेय परदेशात उपचार...

उर्फीचा एक हॉस्पिटलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. ती सध्या दुबईत असून आजारी असल्याची चर्चा होत आहे.
Urfi Javed New Viral Video
Urfi Javed New Viral VideoSaam Tv
Published On

Urfi Javed: बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. उर्फीच्या या स्टाईल्समुळे नेटकरी तिला इतके ट्रोल करत असले तरी त्याचा तिला कोणताही फरक पडत नाही . सध्या ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली असली तरी त्याचे कारण काही तरी वेगळेच आहे. उर्फीचा एक हॉस्पिटलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. ती सध्या दुबईत असून आजारी असल्याची चर्चा होत आहे.

Urfi Javed New Viral Video
Sunil Grover:भारत अनेक पिढ्यांपासून अर्जेंटिनाला सर्पोट करतोय; सुनील ग्रोव्हरने शेअर केलेला कॉमेडी फोटो पाहून तुम्हीही मान्य कराल!

उर्फी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते, तिच्या फॅशन सेन्सने किंवा हटक्या अंदाजातील पोजेसने तिची चर्चा होत असते. नुकतेच उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे, कदाचित ती बातमी वाचल्यानंतर तिच्या चाहत्यांना थोड्या वेळासाठी अस्वस्थ वाटू शकते. दुबईला पोहोचताच उर्फीला 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) या आजाराची माहिती मिळाली, ही माहिती तिने स्वत:च दिली आहे. त्यामुळे तिला दुबईत खास फिरता आले नाही.

Urfi Javed New Viral Video
Fifa World Cup: मस्तीखोर रणवीरची चाहत्यासाठी 'एक स्माईल प्लिज', फिफा वर्ल्ड कपमध्ये रणबीर- दीपिकाचे व्हिडीओ व्हायरल...

सध्या तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 'माझा अर्धा खर्च तर या आजारातून बरा होण्यातच खर्च झाला.' अशी पोस्ट उर्फीने तिच्या लाडक्या चाहत्यांसाठी लिहिली आहे. उर्फीला दुबईमध्ये तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करताच तिच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या आहे. उर्फीवर सध्या दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून डॉक्टरांनी तिला बोलण्यास मनाई केली आहे.

Urfi Javed New Viral Video
Kangana Ranaut: कंगनाने संसद परिसरात 'इमर्जन्सी'च्या शूटिंगसाठी मागितली परवानगी; नेटिझन्सनी केलं ट्रोल...

उर्फीला निदान झालेल्या आजाराची थोडक्यात माहिती

उर्फीला 'लॅरिन्जायटीस' हा झालेला आजार फार गंभीर नाही. 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) म्हणजे घशात होणारी जळजळ, सूज येणे आणि इन्फेक्शन होते. जर हा त्रास तुम्हाला जास्तच होऊ लागला तर तुमच्या आवाजात हळूहळू बदल होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. आवाजात इतका बदल होतो की, आपल्यालाच आपला आवाज ओळखू येत नाही. हा जरी गंभीर आजार नसला तरी, त्यावर तात्काळ उपचार केले नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com