sohail Khan
sohail Khansaamtv

Sohail Khan Birthday: अभिनेता, निर्माता ते दिग्दर्शक; सोहेल खानचा सिनेप्रवास; 'या' चित्रपटांमुळे बसला फ्लॉपचा शिक्का

नव्वदच्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने लोकप्रियता मिळणाऱ्या सोहेल खानचा आज (20, डिसेंबर) वाढदिवस.
Published on

Sohail Khan: सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान हे तीन्ही भाऊ बॉलिवूडमध्ये खान ब्रदर्स म्हणून ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये भाईजानची चर्चा तर होतेच त्याचबरोबर सर्वात लहान असलेल्या सोहेल खानच्याही अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने लोकप्रियता मिळणाऱ्या सोहेल खानचा आज (२०, डिसेंबर) वाढदिवस. जाणून घेवूया त्याच्या सिने जगतातील प्रवासाबद्दल.

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता म्हणून सोहेल खानचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सोहेलचा जन्म २० डिसेंबर १९७० ला झाला. बालपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या सोहेलनेही सिनेसृष्टीत करियर करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलमान, अरबाजप्रमाणे तो यश मिळवू शकला नाही.

sohail Khan
Lionel Messi Lovestory: बालपणीच्या मैत्रिणीवरचं जडला जीव, लियोनेल मेस्सीची हटके लवस्टोरी

सोहेल खानने आपल्या भावांप्रमाणे थेट चित्रपटात न जाता दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सिने जगतात पाऊल ठेवले. १९९७ मध्ये आलेल्या औजार चित्रपटाचे सोहेलने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खान, संजय कपूर आणि शिल्पा शेट्टी यांनी प्रमूख भूमिका साकारली होती. यानंतर सोहेल खानने सलमान खान (Salman Khan) आणि अरबाज खान यांचय्यासोबत प्यार किया तो डरना क्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. यानंतर सोहेल खानचा चर्चित चित्रपट म्हणजे हॅलो ब्रदर्स. या चित्रपटात सलमान खान, अरबाज खान आणि रानी मुखर्जी यांनी भूमिका साकारल्या होत्या. सोहेल खानने २००२ मध्ये आलेल्या मैंने प्यार तुझको किया या चित्रपटात लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि प्रमूख भूमिकेतही काम केले होते.

sohail Khan
Crime News : ब्रँडेड सिगारेटच्या व्यसनापायी 'तो' बनला अट्टल चोर; असा अडकला जाळ्यात

या चित्रपटातून अभिनेत्री समीरा रेड्डीनेही बॉलिवूमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपटही चमकदार कामगिरी करु शकला नाही त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट आले मात्र बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करु शकले नाहीत. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये तो आपला जम बसवू शकला नाही.

आपल्या फ्लॉप अभिनय कारकिर्दिसोबतच सोहेल खान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत राहिला. अलिकडेच सोहेलने त्याची पत्नी सीमा सचदेहला घटस्फोट देत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दोघांची लवस्टोरीही खूपच फिल्मी आहे. १९८०मध्ये सोहेल आणि सीमा सचदेवने घरातून पळून जाऊन लग्न केले होते.

दरम्यान अभिनेता सोहेल खानने डरना मना है, कृष्णा कॉटेज, आर्यन, हिरोज, गॉड तुसी ग्रेट हो, लवयात्री या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर हॅलो ब्रदर, पार्टनर, गॉड तुसी ग्रेट हो, रेडी या चित्रपटांची निर्मीती केली आहे. टेलिव्हिजनवर कॉमेडी सर्कस का नया दौर या कार्यक्रमात त्याने परीक्षक म्हणूनही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com