Shiv Thakare In Khatron Ke Khilaadi 13 In Top 5 Contestant Instagram
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare News: माझ्यातला अभिनेता घडवण्यात ‘खतरों के खिलाडी’चा मोठा हात, काय म्हणाला बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे

Shiv Thakare: ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये शिवने टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्वत:चं स्थान निश्चित केलं आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare In Khatron Ke Khilaadi 13

लढाऊ भावनेचा विचार केला तर रिॲलिटी शो स्पर्धक शिव ठाकरे मिस्टर अनस्टॉपेबल आहे. ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये शिवने टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्वत:चं स्थान निश्चित केलं आहे. शिव ठाकरेने आतापर्यंत ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी २’, ‘बिग बॉस १६’च्या माध्यमातून त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता त्यानंतर शिव ठाकरेने ‘खतरों के खिलाडी १३’ च्या सेमीफायनलमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे.

शोच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये शिव ठाकरेने पोहोचल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे, तो म्हणतो, “ ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मी खूप आनंदी आहे. मेहनत, बाप्पाचा आशिर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम यामुळे मी आतापर्यंत हे काम केले आहे. मी माझा प्रवास हा नेहमीच शिकण्याचा अनुभव म्हणून पाहतो, मग तो रोडीज असो, बिग बॉस मराठी असो किंवा बिग बॉस सीझन १६. मी एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आणि स्पर्धक म्हणूनही खुपकाही शिकलोय. पण अभिनेता होण्याचे माझे स्वप्न ‘खतरों के खिलाडी’ ने मला तयार केले आहे.

शिव ठाकरे पुढे म्हणतो, “प्रत्येकाला माहिती आहे की, माझे भविष्यातील लक्ष्य अभिनेता बनणे आहे, या शोमध्ये आम्हाला अशी कामे करायला भेटली जी कोणत्याही ॲक्शन थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाहीत. शिवाय, रोहित शेट्टी सारखे ॲक्शन डायरेक्टर सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी होते. ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर माझ्या ॲक्शनची ट्रेनिंग झाली आहे आणि माझ्याकडे डान्स ॲकॅडमी सुद्धा आहे, त्यामुळे डान्सर म्हणून ही मी तयार आहे. आता मी माझे कौशल्य दाखवण्यासाठी एका मंचाची वाट पाहत आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

मे महिन्यापासून ‘खतरों के खिलाडी १३’च्या शुटिंगला सुरूवात झाली होती. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामध्ये या शोची ॲक्शन थ्रिलर पद्धतीने सुरुवात झाली. या शोमध्ये ‘बिग बॉस १६’मधील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT