Salman Khan House Firing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan House Firing Case: गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या घरी पोहचले पोलिस, अभिनेत्यासह भावाचाही नोंदवला जबाब

Priya More

सचिन गाड, मुंबई

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने सलमान खानचा जबाब नोंदवला आहे. सलमान खानसोबत त्याचा भाऊ अरबाज खानचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. सलमान खानच्या घरावर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.

एप्रिल महिन्यात सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आता या प्रकरणी अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी बुधवारी गोळीबार प्रकरणी सलमान खानचा जबाब नोंदवला. १४ एप्रिल रोजी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी जाऊन त्याचा जबाब नोंदवला. यावेळी त्याचा भाऊ अरबाजचा देखील जबाब नोंदवून घेतला गेला.

या गोळीबारामध्ये सलमान खानच्या कुटुंबातील कोणी जखमी झाले नव्हते. या घटनेनंतर सलमानसोबत त्याच्या घरातील सर्व सदस्य सतर्क झाले. गोळीबाराच्या या घटनेनंतर सलमान खानसोबत त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी दिली.

दरम्यान, १४ एप्रिल रोजी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. याप्रकरणी गोळीबार करणारे आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील अनुज थापन नावाच्या आरोपीने १ मे रोजी पोलिस लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack in Garba : गरबा खेळताना तुम्हालाही येऊ शकतो हार्टअटॅक; बचावासाठी 'या' स्टेप्स नक्की फॉलो करा

Drinking tea: एक महिना चहा पिणं सोडल्यास शरीरात काय बदल होतील? पाहा...!

Dance Video: नादच खुळा! आजोबांनी नातवंडांसोबत धरला ठेका, स्टेप्स एकदा बघाच

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

SCROLL FOR NEXT