Sahil Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात साहिल खानच्या अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Sahil Khan Problem Increased: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी सौरभ चंद्राकर, रवी उपल यांच्यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये साहिल खानचे देखील नाव आहे.

Priya More

Actor Sahil Khan:

महादेव बुक ऑनलाईन बेटिंग प्रकरणामध्ये (Mahadev App Case) बॉलिवूड (Bollywood) अभिनेता साहिल खानच्या (Sahil Khan) अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी सौरभ चंद्राकर, रवी उपल यांच्यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यामध्ये अभिनेता साहिल खान याचे नाव होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्याने कोर्टामध्ये धाव घेतली होती. पण कोर्टाकडून त्याला दिलासा मिळाला नाही. कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बुक ऑनलाईन बेटिंग प्रकरणात मुंबईतील अंबोली पोलिसांनी साहिल खानसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर साहिलने मुंबई सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. याप्रकरणात १५ हजार कोटींची आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम याचाही या सगळ्यात सहभाग असल्याचे सांगितले आहे. त्यासंदर्भात साहिल खानची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, 'आरोपींनी 67 वेगवेगळ्या बेटिंग साइट तयार केल्या आहेत आणि त्याद्वारे लोकांना बेकायदेशीरपणे सट्टा लावला जातो. पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी आरोपींनी 2000 हून अधिक सिमकार्डचा वापर केला असून ही सिमकार्ड खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे.'

देशाबाहेर पैसे पाठवण्यासाठी आणि क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 1700 बनावट बँक खाती तयार करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकांमध्ये ही खाती तयार करण्यात आली होती. पोलिसांनी असेही सांगितले की, आरोपींनी त्यांच्या बेटिंग वेब पोर्टलच्या प्रचारासाठी 1000 हून अधिक टेलिग्राम चॅनेल आणि व्हॉट्सअॅपचा वापर केला आहे. पोलिसांनी सर्व बँक खाती, बेटिंग वेब पोर्टल आणि सिम कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून अधिक माहिती मागवली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अभिनेता साहिल खान व्यक्तिरिक्त रणबीर कपूर, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली अजगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, एली अवराम, भारती सिंग, सनी लिओन, भाग्य श्री, पुलकित, कीर्ती. खरबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक अशी मोठी नावे पुढे आली होती. साहिल खानबद्दल सांगायचे तर, 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आता चित्रपटांपासून दूर होते फिटनेस एक्सपर्ट बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT