बॉलिवूडचा सुपरस्टार रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक दिवाने आहेत. रितेश देशमुखने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. कोणतीही भूमिका असो रितेश ती उत्तमरित्या साकारतो. रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटांची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या रितेश देशमुख त्याचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा चित्रपट रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणालायला काही हरकत नाही. या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच सोशल मीडियावर 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रितेश देशमुखचा खास लूक पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या जीवनावर आधारित आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये सेटवर वावरताना दिसत आहे. तसेच एक अभिनेत्री देखील पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाची निर्मिती जिनिलीया देशमुख करणार आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज होणार आहे. रितेश देशमुखचा हा भव्य चित्रपट 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलीया बॉलिवूडचे पावर कपल आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांना ओळखले जाते. यांचा सोशल मीडियावर सुद्धा मोठा चाहता वर्ग आहे. आपले कॉमेडी व्हिडीओ ते कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चाहते कायमच यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना पाहायला मिळतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.