Karan Veer-Shrutika Arjun : करण वीर मेहराने सर्वांसमोर केलं श्रुतिका अर्जुनला किस, पुढे काय घडलं?

Karan Veer Mehra Kiss Shrutika Arjun : 'बिग बॉस 18'चा विजेता करण वीर मेहराने श्रुतिका अर्जुनला किस केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Karan Veer Mehra Kiss Shrutika Arjun
Karan Veer-Shrutika ArjunSAAM TV
Published On

जानेवारी महिन्यात 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) फिनाले पार पडला होता. यंदाचा सीझन खूप गाजलेला पाहायला मिळाला. 'बिग बॉस 18' ची ट्रॉफी करण वीर मेहराने उचलली. करण वीरच्या जिंकण्यामुळे घरातील अनेक सदस्य आनंदी पाहायला मिळाले. यात चुम दरांग आणि शिल्पा शिरोडकर यांचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरात करण वीर मेहराची चुम दरांग आणि शिल्पा शिरोडकरसोबत चांगली मैत्री पाहायला मिळाली.

आता करण वीर मेहरा (Karan Veer Mehra) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये करण वीर मेहरा श्रुतिका अर्जुनला किस करताना पाहायला मिळत आहे. करण वीर मेहरा आणि श्रुतिका अर्जुन बिग बॉसच्या घरात कधी एकमेकांसाठी बोलताना तर कधी एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळाले. मात्र आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

गुरुवारी संध्याकाळी एका कार्यक्रमाला करण वीर मेहरा आणि श्रुतिका अर्जुनने (Shrutika Arjun ) उपस्थिती लावली होती. तेव्हा यांना एकत्र स्पॉट करण्यात आले. करण वीर मेहरा श्रुतिकाची मस्ती करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला. त्याने श्रुतिकाला मिठी मारली नाही. मात्र नंतर त्याने श्रुतिकाच्या गालावर किस केले आणि मग मिठी देखील मारली. यानंतर दोघेही हसतात आणि एकमेकांसोबत मजा करताना दिसले. या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'बिग बॉस 18'चे सीझन करण वीर मेहरा आणि विवियन डिसेनाने गाजवले. घरात पहिल्या दिवसापासून यांच्यात वाद होताना दिसले. बिग बॉसमधील करण वीर मेहराचा खेळ काही प्रेक्षकांना आवडला तर काहींना नाही. अनेकांच्या मते विवियन डिसेना 'बिग बॉस 18' विजेता झाला पाहिजे होता. मात्र या सर्व प्रतिक्रियांवर करण वीर मेहरा दुलर्क्ष करून पुढे गेला आहे.

Karan Veer Mehra Kiss Shrutika Arjun
Lai Avadtes Tu Mala : मालिकेत नवा ट्विस्ट; सरकार अन् सानिकावर साहेबराव घेणार सूड, गृहप्रवेशाच्या दिवशी कोणते विघ्न येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com