Riteish Deshmukh Birthday : माजी मुख्यमंत्र्याचा लेक, मराठीसह बॉलिवूडही गाजवलं; रितेश भाऊ किती कोटींचा मालक?

Riteish Deshmukh Net Worth : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहे. वाढदिवसानिमित्त रितेश भाऊंचे नेटवर्थ जाणून घेऊयात.
Riteish Deshmukh Net Worth
Riteish Deshmukh BirthdaySAAM TV
Published On

आज महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ (Riteish Deshmukh Birthday) 46 वर्षांचा झाला आहे. आज ( 17 डिसेंबर)ला रितेश देशमुखचा वाढदिवस आहे. रितेश देशमुखला अभिनयासोबत राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. तो महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. रितेशने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया (Genelia ) हे महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहे. बॉलिवूडचे ते पावर कपल आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट करून त्यांनी 2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. रितेश देशमुख आणि जिनिलीयाला दोन मुलं आहेत. त्यांची नावे रियान आणि राहील अशी आहेत. चांगल्या संस्कारांसाठी रितेशच्या मुलांचे कायमच कौतुक होते.

रितेश देशमुख नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखची संपत्ती तब्बल 138 कोटींच्या वर आहे. रितेश देशमुख चित्रपट, जाहिराती आणि प्रॉडक्शन हाऊसमधून कोट्यावधींची कमाई करतो. रितेश देशमुखने 2013मध्ये 'मुंबई फिल्म कंपनी' नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. रितेश देशमुख एका चित्रपटासाठी 6 ते 7 कोटी रुपये घेतो. तसेच तो अनेक ब्रँड प्रमोशन देखील करतो. ज्यातून त्याची चांगली कमाई होते. मीडिया रिपोर्टनुसार, रितेशने बिग बॉसच्या होस्टिंगसाठी एका एपिसोडचे 20 ते 25 लाखांचे मानधन घेतलं होते.

रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम' या 2003 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत जिनिलीयाने काम केले आहे. रितेश देशमुखने हिंदी चित्रपट सृष्टीसोबत मराठी मनोरंजन सृष्टी देखील गाजवली आहे. त्याचा वेड हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. या चित्रपटात देखील रितेश आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत.

रितेश देशमुख हा कमाल आर्किटेक्ट देखील आहे. रितेश देशमुखने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'लय भारी'चित्रपटातून मराठी चित्रपट विश्वात पदार्पण केले. त्याचा हा चित्रपट खूप गाजला. अलिकडेच रितेश भाऊंनी 'बिग बॉस मराठी 5' चे दमदार होस्टिंग केले. त्यांच्या होस्टिंगने महाराष्ट्राला वेड लावले.

Riteish Deshmukh Net Worth
Genelia : जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे! देशमुखांच्या घरी नाताळची जय्यत तयारी सुरू, रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com