Riteish Deshmukh Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh Post : EVM चा अर्थ तुम्हाला माहितीये का?, अभिनेता रितेश देशमुखने सांगितला मोजक्याच शब्दात अर्थ

Riteish Deshmukh News : रितेश नेहमीच सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमातून आपले परखड राजकीय मत व्यक्त करताना दिसतो. आज देशाचं लक्ष लागलेल्या या निकालावरही ट्विट करत त्याने आपलं मत मांडलं आहे.

Chetan Bodke

सध्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. रितेश जितका अभिनयामध्ये सक्रिय असतो, तितकाच लातूरच्या राजकारणातही सक्रिय असतो. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिनेत्याने उपस्थिती लावली होती. अशातच अभिनेत्याने X पोस्ट शेअर करत आजच्या निकालावर भाष्य केलेले आहे. पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना EVM चा अर्थ सांगितला आहे.

रितेश नेहमीच सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमातून आपले परखड राजकीय मत व्यक्त करताना दिसतो. आज देशाचं लक्ष लागलेल्या या निकालावरही ट्विट करत त्याने आपलं मत मांडलं आहे. X पोस्टमध्ये रितेशने लिहिले की, " EVM- Every Vote Matters" (प्रत्येक मत महत्वाचं) अशी पोस्ट त्याने शेअर केलेली आहे. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या ह्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक वेगवेगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत.

रितेश देशमुखच्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा दारुण पराभव केला आहे. काळगे यांनी मोठ्या मताधिक्याने भाजप उमेदवार सुधाकर शृंगारेंचा पराभव केलेला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये अतितढीची लढत होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लातूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराा दारुण पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

SCROLL FOR NEXT