HBD Ranveer Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Ranveer Singh Instagram Post Deleted : आज बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा वाढदिवस आहे. वाढदिवसाआधी रणवीरने इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहचा (Ranveer Singh Birthday ) आज (6 जुलै) वाढदिवस आहे. रणवीर सिंह आज 40 वर्षांचा झाला आहे. रणवीर सिंहने 2010 साली'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. रणवीरने आपल्या हटके स्टाइलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तो कायम आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असतो. मात्र आता रणवीर सिंह एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने वाढदिवसा आधी केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रणवीर सिंहने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या आपल्या अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. आपल्या वाढदिवसाआधी म्हणजे (5 जुलै)ला रणवीरने इन्स्टाग्रामवरील पोस्ट हटवल्या आहेत. रणवीरचा प्रोफाइल फोटोही दिसत नाही आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक शेवटची स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने '12: 12' असे लिहिलं आहे. तसेच क्रॉस्ड स्वॉर्ड्सचा इमोजी देखील दिला आहे. रणवीर सिंहच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहेत. नेटकरी रणवीरच्या अशा कृती मागचे कारण जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.

ranveer singh

सध्या रणवीर सिंह त्याचा आगामी चित्रपट 'धुरंधर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटात त्याचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

नेटकरी रणवीर सिंहच्या इन्स्टाग्राम पोस्ट डिलिट मागे 'धुरंधर' चित्रपटत असल्याचे बोलत आहे. रणवीर सिंहने 'धुरंधर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असे केल्याची चर्चा सोशल मीडियावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT