Ranbir Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : रणबीर कपूर करतोय 'लव्ह अँड वॉर'ची तयारी; जिममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Ranbir Kapoor Fitness : रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटाची दमदार तयारी करताना दिसत आहे. त्याचा वर्कआउट करतानाचा फोटो आणि व्हिडीओ समोर आला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नेहमीच त्याच्या कामासाठी ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तरूणाईमध्ये रणबीरचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर'मध्ये (Love And War ) व्यस्त आहे. चित्रपटाची तयारी करताना रणबीर पाहायला मिळत आहे. अभिनेता रणबीर कपूर सध्या चित्रपटासाठी वर्कआऊट करताना दिसत आहे.

रणबीर कपूरचा जिममध्ये वर्कआऊट (Fitness ) करतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये रणबीर जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. फोटोमध्ये व्यायाम करतानाचा एअरप्लेन मोड पाहायला मिळत आहे. रणबीरच्या फिटनेसची झलक येथे पाहायला मिळत आहे. तो आपल्या शरीरावर खूप मेहनत घेताना दिसत आहे.

'लव्ह अँड वॉर' या चित्रपट संजय लीला भन्साळी यांचा आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील पाहायला मिळत आहे. चित्रपटात खूप तगडी स्टारकास्ट आहे. हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. मात्र अजूनही चित्रपटाची कथा आणि भूमिकांचा खुलासा करण्यात आला नाही आहे.

'लव्ह अँड वॉर' चित्रपटात एक मॉर्डन लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे. चाहते देखील या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूरच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. रणबीरचा वर्कआऊट करतानाचा फोटो पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

SCROLL FOR NEXT