Nadaaniyan Trailer: इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरची 'फेक लव्ह स्टोरी'; स्टारकिड्सच्या 'नादानियां'चा ट्रेलर प्रदर्शित

Nadaaniyan Trailer: नेटफ्लिक्सच्या नवीन रोमँटिक चित्रपट 'नादानियां'च्या ट्रेलरमध्ये इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट एका नवीन काळातील प्रेमकथेवर आधारित आहे.
Nadaaniyan Trailer
Nadaaniyan TrailerSaam Tv
Published On

Nadaaniyan Trailer: नेटफ्लिक्सने नुकताच इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'नादानियां' या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. धर्मॅटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा निर्मित हा चित्रपट फुल ऑन ड्रम आहे.

अर्जुन मेहता (इब्राहिम अली खान) एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा दाखवण्यात आला आहे. तर पिया जय सिंह (ख़ुशी कपूर) एक चांगल्या कघरातील मुलगी आहे, जिचा असा विश्वास आहे की प्रेम एका परिपूर्ण पटकथेनुसार व्हायला हवे. जेव्हा पिया अर्जुनला तिच्या फेक बॉयफ्रेंड होण्यास सांगते तेव्हा सगळं बदलतं.

Nadaaniyan Trailer
Zee Chitra Gaurav 2025: चिमुकल्या जिनिलियाने केली रितेशची फजिती; तर, अमेय वाघला दिले खास पार्टीच आमंत्रण

'नादानियां' चा ट्रेलर आणि रिलीज तारीख

एकंदरीत जर आपण ट्रेलरचा आढावा घेतला तर यामध्ये स्टुडंट ऑफ द इयरची काहीशी झलक पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपट एकत्र करून जणू काही नवीन पिढीची प्रेमकथा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते. बाकी, हा चित्रपट ७ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

Nadaaniyan Trailer
Shahrukh khan: दूरदर्शन ते बॉलिवूड किंग खान.... फौजी नाही तर शाहरुख खानचे हे पहिले काम तुम्हाला माहिती आहे का?

'नादानियां' मधील कलाकार

'नादानियां' या चित्रपटात इब्राहिम अली खान आणि ख़ुशी कपूर व्यतिरिक्त महिमा चौधरी, सुनील शेट्टी, दिया मिर्झा आणि जुगल हंसराज हे कलाकार आहेत जे या दोघांच्या पालकांची भूमिका साकारतात. पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शिका शौना गौतमसाठी, 'नादानियां' हा एक अतिशय खास प्रकल्प आहे जो एका नवीन काळातील प्रेमकथा दाखवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com