Shruti Kadam
शाहरुख खान संपूर्ण बॉलीवूडवर राज्य करत आहे.
शाहरुख खानने ९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तर, १४ फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्याला मिळवले आहेत.
शाहरुख खानला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने तर फ्रान्स सरकारकडून त्याला ऑर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस आणि लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे.
शाहरुख खानने १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात दूरदर्शन मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
१९९२ मध्ये दीवाना चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्यांनतर आतापर्यंत त्याने बाजीगर (१९९३) डर (१९९३) दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे (१९९५), दिल तो पागल है (१९९७), कुछ कुछ होता है (१९९८), मोहब्बतें (२०००), कभी खुशी कभी गम... (२००१), कल हो ना हो (२००३), वीर-झारा (२००४) , देवदास(२००२) यांसारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शाहरुख खानने २०१५ साली रेड चिलीज एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनीची सुरुवात केली.
शाहरुख खानचे पहिले या मनोरंजन क्षेत्रातील काम म्हणजे 1988 साली आलेल्या दिल दरिया या दूरदर्शन वरील मालिकेतील होते.