Shruti Kadam
सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून शिवाली परबने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
शिवालीचा नुकताच मंगला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
शिवालीने पाणीपुरी, चंद्रमुखी सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिवाली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते.
मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
२२ मराठा बटालियन या चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनय बेर्डे, उत्कर्ष शिंदे, यश डिंबळे, सपना माने, टिशा संजय पगारे, अमृता धोंगडे, शिवाली परब, आयुश्री पवार अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
‘२२ मराठा बटालियन' हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनितीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे.