Pankaj Tripathi Brother In Law Passed Away
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीचे रस्ता अपघातामध्ये निधन झाले आहे. अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीचा नवरा म्हणजेच भावोजींचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यांच्या भावोजींचा झारखंडच्या धनबादच्या निरसा येथील जीटी रोडवर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पंकज यांच्या भावोजींचे निधन झाले असून त्यांच्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग– २ वर निरसा बाजार येथे शनिवारी (२० एप्रिल) दुपारी ४.३०च्या सुमारास त्यांचा कार अपघात झाला. प्रवास करत असलेल्या त्यांच्या कारने रस्ता दुभाजकाला धडक दिली.
पंकज यांची बहिण आणि भावोजी बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून पश्चिम बंगालकडे निघाले होते. पंकज यांच्या भावोजींचे नाव राकेश तिवारी असं असून पंकज यांच्या बहिणीचे नाव सबिता तिवारी असं आहे. राकेश आणि सबिता यांचा अपघात झारखंडच्या धनबादच्या निरसा बाजार चौकात येण्यापूर्वी हा अपघात झाला.
कारची स्थिती पाहून, त्यांची कार भरधाव वेगाने येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान, डिव्हायडरला कार धडकल्याने कारचे बोनेटचा चक्काचूर झाला असून गाडीच्या आतल्या भागाची खूप वाईट परिस्थिती झाली.
त्यांचा अपघात होताच स्थानिक पोलिसांनी आणि तेथील नागरिकांनी त्या दोघांनाही धनबादमधील शहीद निर्मल महतो वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. पण राकेश तिवारी यांची प्रकृती गंभीर होती, पण त्यांना रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित केले. सबिता तिवारी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आयसीयु विभागात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सबिता यांच्या जीवाला धोका नसल्याचं त्यांनी सांगितले. (Bollywood News)
लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "माझा मित्र, अभिनेता आणि भाऊ पंकज त्रिपाठीच्या भावोजींचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना." घटनेवर शोक व्यक्त करत पंकज त्रिपाठी यांनाही टॅग केले. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.