Land Scam Case: झारखंड जमीन घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; छापेमारीनंतर झामुमो नेत्यासह चार जणांना अटक

Jharkhand Land Scam Case: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना यापूर्वीच जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाशी झामुमोच्या नेत्यांचाही संबंध जोडला जात आहे.
Jharkhand Land Scam Case
Jharkhand Land Scam Sakal
Published On

अंमलबजावणी संचालनालयाने आज झारखंड जमीन घोटाळ्याप्रकरणी (Jharkhand Land Scam Case) चार जणांना अटक केली. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते अंतू तिर्की यांचाही समावेश आहे. तिर्की व्यतिरिक्त तपास यंत्रणेने प्रियरंजन सहाय, रिअल इस्टेट व्यावसायिक विपिन सिंग आणि इर्शाद यांना देखील अटक केली आहे. मंगळवारी (१६ एप्रिल) त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा त्याला रांची येथील ईडी कार्यालयात आणण्यात आलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली.

जमीन घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणेने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जानेवारी महिन्यात अटक केली होती. रांचीमध्ये 8.86 एकर जमीन संपादित केल्याप्रकरणी हेमेंत सोरेन विरोधात ईडी चौकशी करत (Land Scam Case) आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी ही जमीन बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करून घेतल्याचा ईडीने आरोप केला आहे. या प्रकरणात अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. अनेक प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेने चौकशीनंतर लोकांना अटकही केली आहे.

त्याच वेळी, घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ईडीने (ED) मंगळवारी (16 एप्रिल) आणखी एका व्यक्तीला अटक केली होती. अफशर अली असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मनी लाँड्रिंग प्रकरणात आधीच न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर ईडीने अफशरला नव्या प्रकरणात अटक केली होती. अफशर अली हेमंत सोरेन आणि महसूल विभागाचे माजी उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद (Jharkhand Land Scam Case Update) यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींशी संबंधित असल्याचा आरोप आहे.

Jharkhand Land Scam Case
Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

आरोपींच्या संगनमताने झारखंडमधील जमिनी बळकावण्यासाठी त्याने फसवणूक केली. या प्रकरणी ईडीने केलेली ही चौथी अटक आहे. तपास यंत्रणेने जानेवारीत हेमंत सोरेनला पहिल्यांदा अटक केली. सध्या तो (Land Scam Case News) राजधानी रांचीच्या होटवार येथील बिरसा मुंडा तुरुंगामध्ये आहे. त्यानंतर ईडीने भानू प्रताप प्रसाद आणि मोहम्मद सद्दाम हुसेन नावाच्या व्यक्तींनाही अटक केली. यानंतर मंगळवारी जमीन घोटाळ्याप्रकरणी अफशर अलीच्या रूपाने चौथी अटक करण्यात आली आहे.

Jharkhand Land Scam Case
Rajkumar Anand: दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा, काही दिवसांपूर्वी घरावर पडला होता ED चा छापा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com