दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा, काही दिवसांपूर्वी घरावर पडला होता ED चा छापा
Rajkumar AnandSaam tv

Rajkumar Anand: दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा, काही दिवसांपूर्वी घरावर पडला होता ED चा छापा

Aap Party News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर आम आदमी पक्षामध्ये एका मागून एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
Published on

Aap Party News:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर आम आदमी पक्षामध्ये एका मागून एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आप नेते राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.

दलित आमदार, नगरसेवक आणि मंत्र्यांचा पक्ष आदर करत नसल्याचे राजकुमार आनंद यांचे म्हणणे आहे. दलितांची फसवणूक झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे मला पक्षात राहणे अवघड झाले आहे, त्यामुळे मी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत आहे, असं ते म्हणाले आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा, काही दिवसांपूर्वी घरावर पडला होता ED चा छापा
Maharashtra Politics: नाना पटोलेंनी मला काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दिली ऑफर, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनीही पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आम आदमी पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी झाला होता, मात्र आज तो पक्षच भ्रष्टाचारात बुडाला आहे, असे ते म्हणाले.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''मी या सरकारमध्ये काम करू शकत नाही आणि माझे नाव या भ्रष्टाचाराशी जोडले जावे, असे मला वाटत नाही.'' आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अद्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तथाकथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात गेले असताना राजकुमार आनंद यांचा राजीनामा आला आहे.

दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा, काही दिवसांपूर्वी घरावर पडला होता ED चा छापा
Milind Deora: मिलिंद देवरा आणि अजित गोपछडे यांनी घेतली राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकुमार आनंद यांनी राजीनामा दिल्याने आपला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा देण्याच्या वेळेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राज कुमार आनंद म्हणाले, कालपर्यंत आम आदमी पक्षाच्या नेत्यांना उगाच आपल्याला यात फसवलं जात होतं, असं वाटत होतं. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असे दिसते की नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं आहे. आमच्याकडून चूक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com