Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: '२५ कोटी दिले तरी 'ती' गोष्ट करणार नाही!; ज्यामुळं करिअर घडलं त्यावरच नवाजुद्दीन थेट बोलला...

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता अशी ओळख नवाजुद्दीनची आहे. नवाजुद्दीनने मोठ्या कष्टाने यश संपादन केले आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता अशी ओळख नवाजुद्दीनची आहे. नवाजुद्दीनने मोठ्या कष्टाने यश संपादन केले आहे. आज जरी चांगल्या यशाच्या शिखरावर तो पोहोचला असला तरी, त्याने त्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. नवाजुद्दीनने सुरुवातीपासून काही छोट्या-मोठ्या भूमिका साकारत आपला सिनेसृष्टीचा प्रवास सुरु केला होता.

मात्र आज त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे. अगदीच हिरोसारखी आकर्षक प्रतिमा नसतानाही केवळ आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीनने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

नवाजुद्दीनचे अनेक असे चित्रपट आहेत की, त्याच्या छोट्या भूमिकेनेही त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. प्रामुख्याने नवाजुद्दीन सिद्दीकीला गॅंग्स ऑफ वासेपूर या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी त्याच्या चित्रपटातील भूमिकेमुळे कौतुकही केले. पण आता कोणतीही भूमिका छोट्या मानधनात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कामाबद्दल आणि चित्रपटातील भूमिकेबद्दल स्पष्ट केले आहे.

या मुलाखतीत त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. नवाजुद्दीन म्हणतो, " माझ्या सिनेकारकिर्दीत काही चित्रपटातच मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मी अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत. पण आता खूप झाले. कोणी जरी मला २५ कोटी दिले तरी ही मी छोट्या भूमिका करणार नाही."

सोबतच नवाजुद्दीन साकारलेल्या भूमिकेविषयी बोलतो, "मला वाटते की पैसा आणि प्रसिद्धी हे तुमच्या कामाचा भाग आहे. जर तुम्ही तुमचे काम चांगले केले तर पैसा आणि प्रसिद्धी तुमच्या जवळ येईल. जर तुम्ही त्यांचा पाठलाग केला तर तुम्हाला ते कधीच सापडणार नाहीत, म्हणून फक्त चांगले काम करत रहा. आपण कधी कधी पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर धावतो आणि शेवटी काहीच मिळत नाही. माझा विश्वास आहे की स्वतःच्या कामात बदल करा, स्वतःला असे बनवा की पैसा आणि प्रसिद्धी तुमचे गुलाम बनून तुमच्या मागे धावत येईल."

सोबतच तो पुढे म्हणतो, "कॅमेर्‍यामागे इतर गोष्टी करण्याचाही कलाकारांचा ट्रेंड आहे पण माझा असा कोणताही विचार नाही. मला फक्त अभिनय कसा करायचा हे माहित आहे. एवढीच एक गोष्ट माहित आहे, ही महत्वाची बाब आहे."

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या व्रकफ्रंट बद्दल बोलायचे तर, नवाज लवकरच 'हड्डी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून नवाजचा लूकही समोर आला आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या चित्रपटाबाबत नवाजच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. हड्डीसोबतच त्याच्याकडे 'टिकू वेड्स शेरू' आणि 'बोले चुडियाँ' हे दोन चित्रपटसध्या असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

SCROLL FOR NEXT