Kiara-Sidharth New Year Trip: सिद्धार्थ-कियारा मुबंईत परतले, लवकरच सुरू होणार लगीन घाई

सिद्धार्थ-कियारा एकत्र मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे.
Kiara Advani And Sidharth Malhotra
Kiara Advani And Sidharth Malhotra@sidmalhotra

Kiara-Sidharth Return From Dubai : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परदेशात गेले होते. नवीन वर्ष सुरू होताच अनेक सेलिब्रिटींना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. या सेलिब्रिटींमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा देखील समावेश आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईला गेले होते. नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करून हे कपल आज सकाळी परतले आहे. या दोघांना आज एकत्र मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. परंतु दुबईला जाताना सिद्धार्थ आणि कियारा एकत्र नव्हते.

Kiara Advani And Sidharth Malhotra
Shark Tank India: 'शार्क टँक इंडिया सीजन २'मध्ये मोठे बदल

दुबईतून मुंबईत परतताना कियारा एकदम सिंपल लूकमध्ये दिसली. कियाराने यावेळी पिंक टॉप आणि व्हाईट पॅन्ट घातली होती. तर सिद्धार्थने ब्लॅक टी-शर्ट नई पंत वर व्हाईट जॅकेट घातले होते.

सिद्धार्थ आणि कियाराने त्यांचे नवीन वर्ष मनीष मल्होत्रा आणि करण जोहर, राणी मुखर्जी, नीतू कपूर यांच्यासह साजरे केले. मनीषा मल्होत्राने त्यांच्या या न्यू इयर सेलिब्रेशन अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली होते. कियाराने सुद्धा त्यांच्या न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत 'आवडते मल्होत्रा' असे लिहिले होते.

सिद्धार्थ आणि कियारा अनेक महिन्यानापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांच्या लग्नाची देखील चर्चा सुरू आहे. परंतु दोघांनीही त्याच्या नात्यावर आणि आणि लग्नावर अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा ६ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नबंधनात अडकरणार आहेत. तर त्यांचे लग्नापूर्वी होणाऱ्या विधी ४ तारखेपासून सुरू होतील.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला त्यांची कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यांचे लग्न राजस्थानातील जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये पार पडणार आहे. असे म्हटले जाते की, दोघांच्या प्रेमकथेची सुरूवात 'शेरशहा' चित्रपटापासून झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com