Manoj Bajpayee Career Struggle Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Manoj Bajpayee: चार वेळा प्रयत्न करूनही मिळाला नाही ड्रामा स्कुलमध्ये प्रवेश, कसा बनला मनोज वाजपेयी अभिनयविश्वाचा ‘सरदार खान’

Manoj Bajpayee Birthday: मनोज वाजपेयी जरीही आज आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीतला एक प्रसिद्ध चेहरा बनला असला, तरी त्याचा एक यशस्वी अभिनेत्यासाठीचा प्रवास काही सोप्पा नव्हता.

Chetan Bodke

Manoj Bajpayee Career Struggle Story

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आज (२३ एप्रिल) आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. मनोज वाजपेयी जरीही आज आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीतला एक प्रसिद्ध चेहरा बनला असला, तरी त्याचा एक यशस्वी अभिनेत्यासाठीचा प्रवास काही सोप्पा नव्हता. बिहारच्या पश्चिम चंपारणमधील बेलवा या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या मनोजने सुरूवातीच्या काळात खूप स्ट्रगल केलं. अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याच्या स्ट्रगलबद्दल जाणून घेऊया... (Bollywood)

मनोज वाजपेयीचा जन्म २३ एप्रिल १९६९ मध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंज या बेलवा या छोट्याशा गावात झाला. त्याचे वडील शेतकरी होते. मनोजच्या वडीलांची इच्छा होती की, आपल्या मुलाने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी. पण मनोज यांना डॉक्टर नाही तर अभिनेता व्हायचे होते. मनोज वाजपेयीचे खरं नाव मनोज कुमार असं आहे. शाळेत असताना, मनोज यांचा स्वभाव खूप हळवा आणि लाजाळू होता. त्याचा हा स्वभाव बदलावा यासाठी शाळेतले शिक्षक अभिनेत्याला वर्गात उभं राहून हरिवंश राय बच्चन यांची कविता म्हणायला सांगायचे. (Bollywood Actor)

मनोजला खरंतर बालपणापासूनच अभिनयामध्ये जाण्याची इच्छा होती. मनोजला चार वेळा नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश नाकारला. ज्यांच्याकडे पाहून अभिनेता होण्याचे स्वप्न मनोजने पाहिले होते. ते सुद्धा तिथूनच अभिनय शिकले होते. चार वेळा प्रवेश नाकारल्याने अभिनेता खचला होता.त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही आला होता. पण त्याचवेळी रघुवीर यादव यांनी मनोजला अभिनयाची कार्यशाळा करण्याचा सल्ला दिला होता. खरंतर मनोजने आपल्या सिनेकारकिर्दित चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. १९९५ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'स्वाभिमान' या मालिकेतून मनोज वाजपेयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. शेखर कपूरच्या 'बँडिट क्वीन' चित्रपटातून रुपेरी पडदा गाजवला. (Bollywood Film)

पण, राम गोपाल वर्माच्या 'सत्या' चित्रपटातील ‘भिखू म्हात्रे’च्या भूमिकेने मनोजला उत्तम प्रसिद्धी दिली. तर दुसरा चित्रपट म्हणजे 'शूल'. मनोज वाजपेयीला 'सत्या' आणि 'शूल'साठी दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत. तेव्हापासून अभिनेत्याच्या प्रसिद्धीमध्ये फार मोठी वाढ झाली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT