मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं हा मुद्दा उचलून धरून गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास येत्या २६ एप्रिलला रिलीज होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, सेन्सॉर बोर्डने चित्रपट प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे. असे, चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे. (Marathi Movie)
सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही, असं सांगितलं आहे. त्यामुळे, सेन्सॉर बोर्डाकडून 'संघर्ष योद्धा' हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांसाठी थांबवला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध होत आहे. हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले आहे. (Manoj Jarange Patil)
"संघर्षयोद्धा" चित्रपटाचे प्रदर्शन जरी सेन्सॉर बोर्डने थांबवले असले, तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला मी चॅलेंज देऊन सांगतो की, सगळा समाज आणि सगळा महाराष्ट्र हा चित्रपट बघेल. माझ्या ह्या चित्रपटाला शुभेच्छा आहेतच. असं मनोज जरांगे पाटील चित्रपटाबद्दल म्हणाले आहेत. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. तर, शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (Entertainment News)
डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा केली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके यांच्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.